माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिकेला प्रा. दादासाहेब हुलगे यांच्याकडून पाच हजार रुपयांची पुस्तकं सप्रेम भेट…
पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा ज्ञानसेतूचे मार्गदर्शक बाळासाहेब वाघमोडे पाटील यांनी प्रा. दादासाहेब हुलगे सर यांचा सन्मान केला.
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित, ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र, अकलूज शाखा क्र. २ उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रा. दादासाहेब हुलगे सर यांच्यावतीने स्पर्धा परीक्षेची पाच हजार किंमतीची पुस्तके देण्याचे जाहीर केले. त्यावेळी त्यांचा सत्कार पालघर जिल्हा पोलिस अधिक्षक IPS बाळासाहेब वाघमोडे पाटील साहेब यांनी केला. त्यावेळी जीएसटी विभागाचे मुंबई उपायुक्त विकास काळे साहेब, उपजिल्हाधिकारी मा. बाबासाहेब वाघमोडे साहेब, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपजिल्हाधिकारी हरेश सुळ, महसूल विभागाचे अव्वर सचिव विनायक लवटे, सातारा विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, वित्त व लेखाधिकारी महादेव टेळे, सेवानिवृत्त जिल्हा परिषदेचे सीईओ भारत शेंडगे, अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, रॉयल ॲकडमीचे संचालक नायब तहसिलदार उत्तम पवार सर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कर्णवर, प्रतिष्ठानचे सचिव ग्रामविकास अधिकारी हनुमंत वगरे भाऊसाहेब, शाखा अभियंता गोविंद कर्णवर, शाखा अभियंता गोरख बंडगर साहेब, महिला व बालविकास अधिकारी जगन्नाथ गारुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी, नूतन निवड झालेले अधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद कर्णवर पाटील यांनी केले होते.
ज्ञानसेतू अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रास दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता माळशिरसनंतर अकलूज येथे दुसरी शाखा सुरू केलेली आहे. माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान यांनी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला स्तुत्य उपक्रम आहे. भविष्यात माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी शाखा काढणार आहेत. ज्ञानसेतू अभ्यासिकेला फुल नाही फुलाची पाकळी समजून प्राध्यापक दादासाहेब हुलगे सर यांनी पुस्तकांसाठी आर्थिक मदत केलेली असल्याने समाजाला वेगळा आदर्श घालून दिलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng