माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे वाजले की बारा अशी अवस्था होणार का ?
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात, राजकीय भूकंप होण्याची शक्यता ?
भाजपमध्ये गेल्यानंतर निवांत झोप लागते म्हणून ? का, भाजप मधील कोणाची झोप उडविण्याकरता राष्ट्रवादीचा एक गट येणार ? हे काळच ठरवणार…
मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्षाचे महाविकास आघाडी सरकार कोसळून शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे भाजपच्या विचाराचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात स्थापन झाले असल्याने महाराष्ट्रामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे वाजले की बारा अशी अवस्था होणार का ?, अशी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे.
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून राजकीय भूकंप पाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, दुसरीकडे भाजपमध्ये गेल्यानंतर निवांत झोप लागते म्हणून राष्ट्रवादीतील गट जाणार आहे का ?, भाजपमधील कोणाची झोप उडविण्याकरता जाणार आहे, हे येणारा काळच ठरवेल असेही बोलले जात आहे.माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वेगळीच कलाटणी मिळालेली आहे.
लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाची निर्मिती झालेली आहे. माळशिरस तालुक्यातील पारंपारिक विरोधी गटातील काही नेते व कार्यकर्ते भाजपसोबत राहिलेले होते तर, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील नेते व कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी घडलेली राजकीय स्थित्यंतरे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पाठीशी मूकसंमती दिली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.
मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माळशिरस विधानसभा व माळशिरस तालुका असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात खासदार व आमदार पहिल्यांदाच भाजपचे झालेले आहे. त्या बदल्यात भाजपने मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार केलेले आहे.माळशिरस तालुक्यात पारंपारिक विरोधी गटातील काही नेते व कार्यकर्ते भाजपमध्येच आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात दोन गट आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट भाजपच्या संपर्कात असून दोन-तीन बैठका झालेल्या आहेत. सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
भाजपमध्ये गेल्यानंतर निवांत झोप लागते, असे काँग्रेस व राष्ट्रवादीचे भाजपवाशी झालेले नेते जाहीर सांगत आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचा एक गट निवांत झोप लागावी म्हणून ? का, भाजपमधील कोणाची झोप उडवण्याकरिता जाणार आहे, हा येणारा काळच ठरवणार आहे.जर माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादीच्या घड्याळाचे वाजले की बारा अशी अवस्था होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read with a touch of humor! For further details, check out: READ MORE. What are your thoughts?