माळेवाडी अकलूज येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी
वाघोली (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. मदनसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत सावता माळी देवस्थान ट्रस्ट माळेवाडी, अकलूज व श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी (अ), जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी (अ) यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व महिला भगिनींना व्यासपीठावर विराजमान करण्यासाठी सांगून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच श्री सावतामाळी विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमास सावित्रीच्या वेशात उपस्थित असलेल्या कु. स्नेहल गोडसे हिने ‘मी सावित्री बोलतेय’ या विषयावर सादरीकरण केले.
याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते श्री. चंद्रशेखर गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांच्या जीवनातील विविध पैलू सर्वांसमोर उलगडले. माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. जालिंदरभाऊ फुले यांच्या वतीने जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज या शाळेतील १३६ विद्यार्थ्यांना व श्री. सावतामाळी विद्यालय माळेवाडी (अ) विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना बुट व सॉक्सचे वाटप तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदाताई फुले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास श्री. भारत फुले (संचालक, स. म. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर), श्री. अरुण खंडागळे (माजी सरपंच, माळेवाडी अकलूज), श्री. नामदेव गलांडे (सभापती, श्री सावतामाळी विद्यालय अकलूज माळेवाडी प्रशाला समिती), श्री. रामभाऊ एकतपुरे (माजी कृषी अधिकारी), श्री. बाळासाहेब फुले (माजी उपसरपंच माळेवाडी अकलूज), श्री. महिबुब मुलाणी (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माळेवाडी अकलूज), श्री. राजाराम कांबळे ( श्री सावतामाळी विद्यालय प्रशाला समिती सदस्य), श्री. सदानंद फुले (श्री सावतामाळी विद्यालय अकलूज माळेवाडी प्रशाला समिती सदस्य), श्री. ज्ञानेश्वर माऊली फुले, श्री. ज्ञानेश्वर फुले (शेटजी), श्री. महादेव फुले (माजी पोलीस पाटील माळेवाडी अकलूज ), श्री. संजय एकतपुरे ( प्रगतशील बागायतदार), श्री. सुरज फुले (अध्यक्ष माळशिरस तालुका माळी महासंघ), माळेवाडी येथील महिला मान्यवर, गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ललितागौरी राणे यांनी तर आभार श्री. जालिंदरभाऊ फुले यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng