युवकांनी केवळ व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तीमत्व विकास घडवा – डॉ. विश्वनाथ आवाड
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मौजे चाकोरे येथे शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या “युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” विशेष श्रमसंस्कार शिबीरात युवकांना मार्गदर्शन करताना डॉ. विश्वनाथ आवाड बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तरूणांनी आदर्श जीवन जगण्यासाठी निर्णय क्षमता, भावनांवर नियंत्रण, तटस्थता आणि वस्तुस्थिती विचारात घ्यायला हवी. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवीत समोरच्या व्यक्तीच्या दोन्ही बाजू ऐकून घ्यायला पाहिजेत. आयुष्याच्या वाटचालीत काही गोष्टी सोडून द्यायला शिकता आल्या पाहिजेत. आयुष्यात बदनामी होईल ती स्विकारता यायला हवी कारण, आयुष्यातले काही प्रसंग आपल्याला आणखी मजबुत करण्यासाठीच येतात. स्वत:च आत्मपरीक्षण करा, आपले चांगले गुण तपासा, चुकीचे गुण बाजूला करा, समाजाचं, सभोतालचं निरीक्षण करा, संगीत ऐका, लिहा, वाचा, निर्सग अनुभवा, चुक झाली तर मान्य करा आणि आयुष्यात दोन मित्र जे योग्य सांगतील ते ठेवा. समाज माध्यमांचा वापर करताना केवळ प्रतिक्रीया वादी न होता भुमीकावादी व्हा. केवळ व्यक्ती बनण्यापेक्षा व्यक्तीमत्व बना.

यावेळी ॲड. चंद्रकांत शिंदे, सरपंच नवनाथ जाधव, उपसरपंच सचिन कचरे, किरण भांगे, सागर वरकड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता सातपुते, डॉ. सज्जन पवार, डॉ. दत्तात्रय मगर, प्रा. विजयकुमार शिंदे, प्रा.बलभीम काकुळे, तानाजी बावळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. पुजा जाधव हिने केले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा ससाणे, कु. स्नेहल मगर यांनी केले तर आभार सिध्दी मगर हिने मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng