Uncategorizedताज्या बातम्या

राजकारण, समाजकारण व आदर्श गृहिणी असणाऱ्या स्वर्गीय सौ. वत्सल्ला विजयकुमार बाजारे यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे

महुद ( बारामती झटका )

महुद ता. सांगोला येथील राजकारण, समाजकारण व आदर्श गृहिणी, सुसंस्कृत आचार विचार असणाऱ्या स्वर्गीय सौ. वत्सल्ला विजयकुमार बाजारे यांचे आज दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी प्रथम पुण्यस्मरण आहे.

महूद येथे सुप्रसिद्ध व्यापारी व लिंगायत समाजातील आदर्श व्यक्तिमत्व असणारे सदाशिव बाजारे यांचे चिरंजीव विजयकुमार बाजारे यांच्याशी स्वर्गीय वत्सला यांचा विवाह झालेला होता‌. त्यांना जितेंद्र आणि महेंद्र दोन मुले व सुचित्रा वैभव बर्वे अशी एक कन्या आहे.

पूर्वीपासून बाजारे घराण्यामध्ये राजकारण व समाजकार्याचा मोठा वाटा आहे. पती विजयकुमार बाजारे यांनी माणगंगा सहकारी साखर कारखान्यावर संचालक पदावर काम केलेले आहे. स्वतः वत्सलाताई महुद ग्रामपंचायतच्या माजी सदस्या होत्या. मुलगा जितेंद्र बाजारे महर्षी इम्पेरियल गारमेंट उत्पादन कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत तर, सुनबाई भाग्यश्री जितेंद्र बाजारे महुद ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. दुसरा मुलगा महेंद्र बाजारे अखिल महाराष्ट्र डाळिंब महासंघाचे संचालक व माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत सुनबाई सौ. विद्या महेंद्र बाजारे महाराष्ट्र शासन संचलित विशाखा समितीच्या सदस्या आहेत. त्यांना सहा नातवंडे आहेत.

सांगोला तालुक्यातील महूद पंचक्रोशीत व लिंगायत समाजामध्ये राजकारण, समाजकारण व उद्योग व्यवसायामध्ये प्रगतीपथावर घराणे राहण्याकरता स्वर्गीय सौ. वत्सल्ला बाजारे यांनी सुसंस्कृत व मनमिळाऊ स्वभावामुळे घराण्याला आदर्श घालून दिलेला होता.

गेल्या वर्षी अचानक बाजारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. बघता बघता एक वर्ष पूर्ण होत आलेले आहे. आदर्श राजकारण, समाजकारण करणाऱ्या आदर्श गृहिणी स्वर्गीय सौ. वत्सला बाजारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button