Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी इंग्रजांप्रमाणे निरा-देवधरचे पाणीच नाही तर फलटण-पंढरपुर रेल्वेही पळवली, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची टीका

तालुका हिरवागार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

माळशिरस (बारामती झटका)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी इंग्रजांप्रमाणे माढा मतदार संघातील निरा-देवधरचे पाणीच नाही तर फलटण-पंढरपुर रेल्वेही पळवली, अशी जहरी टिका खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नातेपूते येथे नागरी सत्कारास उत्तर देताना केली. पुढे बोलताना ते म्हणाले कि, काळजी करू नका, मूख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस या मतदार संघाला काहीही कमी पडू देणार नाहीत, अशी हमी देतो.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा-देवधर कॅनाॅलच्या कामासाठी ३९७६ कोटी तर फलटण-पंढरपुर रेल्वे मार्गासाठी ९२१ कोटी शासनाकडून मंजूर करून आणल्याबद्दल माळशिरस तालूका भाजप, नातेपुते शहर भाजप, निरा-देवधर संघर्षसमितीच्यावतीने नागरी सत्काराचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.

पूढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले कि, २००९ च्या लोकसभेला मी व रामराजेंनी एका व्यासपिठावर बसुन पवारांना मताधिक्य दिले, कारण या मतदार संघाचा जागता राजा विकास करेल, ती आशा फोल ठरली पण, आता काळजी करू नका, देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर आहेत, काहीही मागा, ती देण्याची जबाबदारी माझी…

या सत्काराच्या प्रारंभी सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले तर भाजपा किसन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी निरा-देवधरचा इतिहास सांगीतला. तसेच यावेळी हणमंतराव सूळ यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्याची मागणी केली.

या नागरी सत्कारासाठी के. के. पाटील, हणमंतराव सूळ, आप्पासाहेब देशमुख, सोपानराव नारनवर, बाळासाहेब सरगर, दादासाहेब उराडे, पांडुरंग वाघमोडे, प्रविण काळे, संजय देशमूख, नगससेवक दिपक काळे, ज्ञानेश्वर उराडे, देविदास चांगण, सूधीर काळे, संजय उराडे, हणमंतराव ढालपे, युवराज वाघमोडे आदी मान्यवर तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निरा-देवधर प्रकल्प व फलटण-पंढरपुर रेल्वेमार्गासाठी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांनीही प्रयत्न केल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले. शरद पवारांच्या मी डोक्यातच नाही तर हृदयातसुद्धा आहे. गेल्या अडीच वर्षात अनेक प्रकरणे काढून माझ्यामागे भूंगे लावण्याचा प्रयत्न केला पण, परमेश्वर आणि देवेंद्र फडणवीस यांची शक्ती मागे असल्यामूळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही.

निरा-देवधर प्रकल्प व लोणंद-पंढरपुर रेल्वे माझे वडील कै. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न साकार झाल्याने समाधान वाटले. यापुढे माळशिरस तालूक्यात एम.आय.डी.सी व बूलेट ट्रेन आणणार असून तालूका हिरवागार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button