Uncategorized

रेणुका पतसंस्थेचे चेअरमन बाबाराजे देशमुख तर रेणुका महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुचित्रादेवी देशमुख

व्हा.चेअरमनपदी महेश शेटे व सुवर्णा पांढरे, सर्व निवडी बिनविरोध

नातेपुते (बारामती झटका)

रेणुका परिवाराचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नातेपुते येथील रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व रेणुका महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाबाराजे देशमुख, व्हाईस चेअरमनपदी महेश शेटे यांची तर रेणुका महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुचित्रादेवी देशमुख, व्हाईस चेअरमनपदी सुवर्णा पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सन २०२३ ते २८ या सालाकरिता निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळांची सभा निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होऊन चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

यामध्ये रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शहाजीराव मुधोजीराव उर्फ बाबाराजे देशमुख, व्हा. चेअरमनपदी महेश राजाराम शेटे, संचालकपदी अर्जुन बाबुराव जठार, मालोजीराजे शहाजीराव देशमुख, वामन दामोदर पलंगे, दशरथ दत्तात्रय ठोंबरे, अभिजीत सनदकुमार दोशी, अनिल बाबुराव तांबडे, चाँद महिबुब काझी, रेश्मा वालचंद काळे, रेखा महेश इटकर तर रेणुका महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुचित्रादेवी शहाजीराव देशमुख, व्हा. चेअरमनपदी सुवर्णा संपतराव पांढरे, संचालकपदी मिनल मिलिंद कुलकर्णी, श्रुतिका मालोजीराजे देशमुख, साधना शिलकुमार दोशी, चंपाबेन लिलाधर पटेल, सुनिता राजेंद्र तांबडे, रूपाली संतोष उराडे, अर्चना दिपक पलंगे, वैशाली सुनिल मैड, रोहिणी अरविंद सोनवणे अशा बिनविरोध निवडी करण्यात आल्या.

यावेळी रेणुका पतसंस्थेचे व्यवस्थापक नारायण बोराटे, रेणुका महिला पतसंस्थेचे अशोक कर्चे आदीसह संचालक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button