Uncategorizedताज्या बातम्या
लोकनेते उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्यावतीने रक्तदात्यांना रक्तदानाचे जाहीर आवाहन
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादी नेते जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टी यांच्यावतीने व राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदावडे येथे शनिवार दि. 16/7/2022 भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भवानी माता मंदिर पुरंदावडे येथे केले आहे.
तरी सर्वांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng