लोधेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी रोहितदादा पवार विचार मंचचा दणदणीत विजय
जालना (बारामती झटका)
जालना जिल्ह्यातील नांदखेडा तळणी लोधेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या रोहितदादा पवार विचार मंचचा दणदणीत विजय झाला आहे. यावेळी चेअरमनपदी विजय किसनराव बोचरेतर व्हाईस चेअरमनपदी रामचंद्र ओळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीप्रसंगी राजेंद्र हरिश्चंद्र बोचरे यांनी अनुमोदन दिले. तसेच सदस्यपदी कडुबा चोखा मिसाळ, संतोष नामदेव ओळेकर, काशिनाथ भिमराव ओळेकर, शांताबाई रामदास ओळेकर, मुद्दिसिग तोडावत यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

रोहित पवार विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष राजु पाटील बोंबले, प्रदेश कार्याध्यक्ष अमोल पाटील सर, प्रदेश सचिव विनोद भाऊ तारडे, प्रदेश कोषाध्यक्ष प्रदिप घालमे पाटील, प्रदेश सदस्य तथा नगरसेवक अमित जाधव, मराठवाडा नेते योगेश मोरे सर, तुळशीराम पाटील, रोहित दादा पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष हरिष कान्हेरे पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र हरिश्चंद्र पाटील बोचरे आदींनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन आणि सदस्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng