Uncategorizedताज्या बातम्या

वेळापूर विकास सोसायटीच्या सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप !

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला सोसायटीचे ज्येष्ठ सभासद पांडुरंग भाऊ माने देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांनी संस्थेचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेने सभासदांना चालू वर्षात ६ कोटी रुपयांचे वाटप केलेले आहे व दीपावली सणासाठी संस्थेच्या सभासदांना २० लाख रुपये लाभांश वाटप करण्यात आला असल्याचे सांगून, सदर संस्था ही महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार रामभाऊ सातपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हा संघटन चिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असल्याचे सांगितले.

यानंतर सहकार महर्षी कारखान्याचे संचालक शंकरराव माने देशमुख, पांडुरंग भाऊ माने देशमुख, चेअरमन अमरसिंह माने देशमुख व व्हा.चेअरमन महादेव भाऊ ताटे व संस्थेचे संचालक यांच्याहस्ते ज्येष्ठ सभासद पांडुरंग सावंत, दत्तात्रय बनकर, बाळासाहेब घाटगे, आजिनाथ अडसूळ, दशरथ मंडले, भीमराव मेटकरी, श्रीमती पार्वती चंदनशिव, यांच्यासह सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक आनंदराव माने देशमुख, अर्जुन भाकरे, बाळासाहेब माने देशमुख, दत्तात्रय माने, विश्वजीत माने देशमुख, श्रीधर देशपांडे, चंद्रकांत क्षीरसागर, हरिदास मेटकरी, आप्पा अडसूळ, मुक्ताबाई आडत, राजसबाई साठे, संस्थेचे सचिव भागवत मिले, क्लार्क शिवाजी आडत, संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार श्रीधर देशपांडे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button