Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

शिवसेना उपतालुका प्रमुख पदी सतीश रुपनवर यांची निवड

जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते पत्र

करमाळा (बारामती झटका)

करमाळा शिवसेना उपतालुका प्रमुखपदी सालसे येथील प्रसिद्ध उद्योजक सतीश रुपनवर यांची निवड करण्यात आली आहे. सतीश रुपनर हे सालसे भागातील दांडगा जनसंपर्क असलेले नेतृत्व असून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या मनात घर निर्माण केले आहे.

आज शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी उप तालुकाप्रमुख पदी सतीश रुपनवर यांची निवड केली असून यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, मुख्यमंत्री वैद्य सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, संजय शीलवंत, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका गायकवाड, उपतालुकाप्रमुख प्रशांत नेटके, तालुका प्रमुख देवानंद बागल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सालसे येथील जालिंदर शिंदे, वैभव गाडगे, विष्णू कदम, तानाजी लोकरे, सोमनाथ वायकुळे, यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शिवसेना मजबूत करून सालसे परिसरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी सतीश रुपनवर यांनी व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Back to top button