Uncategorized

शिवसेना संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळ यांचा झंजावाती दौरा कट्टर शिवसैनिक यांचेकडून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

मळोली ( बारामती झटका )

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळ यांनी झंजावाती दौरा केलेला आहे अनेक ठिकाणी अनिल जी कोकीळ व शिवसेनेचे पदाधिकारी यांचे सन्मानपूर्वक जंगी स्वागत करण्यात येत आहे.

तांदुळवाडी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्याकरता सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळ मळोली गावावरून जात असताना कट्टर शिवसैनिक दत्तात्रय काशीद यांनी अनिलजी कोकीळ यांचा सन्मान केला यावेळी शशिकांत शिंदे तुकाराम काका जाधव प्रदीप जाधव सुभाष तांबवे हनुमंत घाडगे सुभाष सूर्यवंशी बाळू काळे शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अवधूत कुलकर्णी दादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते अनिलजी कोकीळ यांच्या समवेत शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके सर माळशिरस तालुका प्रमुख संतोष भैय्या राऊत सांगोला तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे उपतालुकाप्रमुख निलेश कांबळे ज्येष्ठ नेते लक्ष्मण तात्या डोईफोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सन्मानाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला दत्तात्रय काशीद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये अनेक समाज उपयोगी कामे करीत असतात कट्टर शिवसैनिकांमध्ये त्यांची गणना होत आहे कायम त्यांच्या कपाळाला भगवा गंध असतो हेअर सलून दुकानांमध्ये स्वर्गीय पिताश्री जगन्नाथ काशीद व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची तस्वीरे दुकानात लावलेली आहेत. कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करणाऱ्या लोकांचा अभिमान कायम असतो माळशिरस विधानसभेसाठी माजी मंत्री दिलीप कांबळे निवडणुकीसाठी उभे असताना त्यांचासुद्धा सन्मान करून त्यांच्या सोबत होते असे कट्टर शिवसैनिक दत्तात्रय काशीद यांनी शिवसेनेच्या नेते व पदाधिकारी यांचा सन्मान केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button