शिवामृत दूध संघाच्या तज्ञ संचालक पदी निष्ठावान कार्यकर्त्यांना सुवर्णसंधी मिळाली.
चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी तज्ञ संचालक संग्राम रणनवरे व हरिभाऊ मगर यांचा सन्मान केला.
अकलूज ( बारामती झटका )
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध प्रक्रिया पार पडलेली असून चेअरमन पदी पुनश्च धैर्यशील मोहिते पाटील व चेअरमन पदी दत्तात्रय भिलारे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर तज्ञ संचालक पदी निष्ठावान कार्यकर्ते मांडकी गावचे माजी सरपंच संग्रामसिंह रणनवरे व निमगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ मगर यांची नियुक्ती करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी सन्मान केलेला आहे.
शिवामृत दूध संघाच्या गतवेळच्या निवडणुकीमध्ये संचालक म्हणून संग्रामसिंह रणनवरे व हरिभाऊ मगर यांना संधी मिळालेली होती. माळशिरस तालुक्याच्या समतोल राजकारणासाठी तरुण चेहऱ्यांना शिवामृतच्या संचालक पदाची संधी मिळालेली होती. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या राजकारणामध्ये माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मांडकी गावातील रणनवरे परिवार तीन पिढ्या मोहिते पाटील परिवाराशी एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ घराण्यातील संग्रामसिंह रणनवरे यांना संधी दिलेली आहे. निमगाव येथील स्व. नानासाहेब मगर यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून आजपर्यंत मोहिते पाटील परिवार यांना सहकार्य केलेले आहे. स्व. नानासाहेब मगर यांच्या विचाराने प्रेरित होऊन हरिभाऊ मगर यांचे राजकारण व समाजकारण सुरू असते. मोहिते पाटील परिवार यांच्याशी एकनिष्ठेचे व सलोख्याचे संबंध आहेत. उत्कृष्ट व्याख्याते व सुसंस्कृत स्वभाव यामुळे हरिभाऊ मगर यांनाही तज्ञ संचालक पदाची संधी मिळालेली आहे.
विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांना राजकारणात पहिल्या पिढीने जसे सहकार्य केले त्याच पद्धतीने विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांना युवा पिढीतील अनेक तरुणांचे सहकार्य असते. त्यापैकी संग्रामसिंह रणनवरे व हरिभाऊ मगर यांना तज्ञ संचालक पदाची सुवर्णसंधी दिल्याने निष्ठेचे फळ असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यात सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.info/pl/join?ref=UM6SMJM3