ताज्या बातम्या

राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषद पदी डॉ. श्रद्धा जवंजाळ यांची नियुक्ती.

माळशिरस (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस येथील डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या सामाजिक कामाची लौकिकता पाहता त्यांची राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषदेने राष्ट्रीय महासचिव पदी डॉ. बीरेन दवे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नुकतीच नियुक्ती केली. डॉ‌. श्रद्धा जवंजाळ 12-13 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयात त्याचबरोबर महिला व बालकल्याण उद्धारासाठी दिवस-रात्र झटत असतात. त्यांची सामाजिक बांधिलकी पाहून राष्ट्रीय बाल व महिला कल्याण परिषदेने सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय महासचिव पदी निवड केली.

या परिषदेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय कार्यालय लंडनमध्ये व प्रशासकीय कार्यालय केरळ राज्यात असून या परिषदेने महिला व बालकल्याण यांचा विकास होण्यासाठी डॉ. बिरेन दवे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेरा संस्थांवर काम पहात असून त्यांना आंतरराष्ट्रीय पॅडमॅन म्हणून ओळखले जाते. तसेच या परिषदेचे चेअरमन ऍडवोकेट डॉ. के. विजया राघवन आहेत.

डॉ. श्रद्धा या एलिमिनेशन ऑफ सर्वाइकल कॅन्सर फ्रॉम इंडिया या विषयावर सध्या नऊ ते वीस वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लसीकरण राज्यात विविध ठिकाणी शिबिरे घेऊन याबाबत जागरूकता करत असतात. गर्भाशयाच्या कॅन्सर हा महिलांमधील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आजार असून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या माध्यमातून काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. या संधीचे ते निश्चित सोने करून दाखवतील असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Back to top button