Uncategorized

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा थंडे थंडे कुल कुल, कारखाना सुरू झाला हाउसफुल…

विरोधकांना सभासदांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली हूल, विरोधकांची झाली बत्ती गुल.

माळशिरस ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा सभासदांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वादळी ठरवून गोंधळ करावा, यासाठी विरोधकांनी सभासदांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केलेले होते. हात उंच करून बैठका झाल्यानंतर एकीचे दर्शन घडवून आणलेले होते. मात्र, ऐन सर्वसाधारण सभेच्या वेळी सभासदांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हूल देऊन विरोधकांची बत्ती गुल झाली आहे, अशी अवस्था झालेली आहे. सध्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा थंडे थंडे कुल कुल पार पडून कारखाना सुरळीत सुरू होऊन वाहनांनी हाऊसफुल भरलेला आहे. वरूण राजाच्या आगमनामुळे यार्डात चिखल झालेला असल्याने कारखाना प्रशासन व वाहनधारकांनी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाहतुकीला अडचण होणार नाही, अशी पद्धतीने रस्त्यावर वाहने उभे केलेली आहेत.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी बंद कारखाना अनेक अडचणीतून मार्ग काढून गेल्या वेळेस सुरू केलेला होता. पाच वर्ष कारखाना बंद अवस्थेत असल्याने मशनरी व इतर कामांसाठी पैसे खर्च करावे लागले होते. पूर्वी कारखाना सुरू असताना सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे बिल, कामगारांचे थकीत वेतन राहिलेले होते. पहिल्यांदा कारखाना सुरू करीत असताना सभासद व कामगार आक्रमक होत होते. पहिले आमचे बिल द्या व नंतर कारखाना सुरू करा, अशी भूमिका पाठीमागील वर्षी सभासद व कामगारांनी घेतलेली होती.

सदर सभेच्यावेळी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सभासद व कामगारांना शब्द दिलेला होता. चालू वर्षीचे गाळपासाठी आलेले उसाचे बिल व पाठीमागे थकीत बिलातील 20 टक्के रक्कम दिली जाईल, असा शब्द दिलेला होता आणि तो पाळलेला होता. त्यामुळे सभासदांच्या मनामध्ये कारखाना सुरू राहिल्यानंतर थकीत बिल मिळत आहे, अशी भावना झालेली होती.

मात्र, विरोधी विचाराच्या लोकांना कारखाना दुसऱ्यांदा सुरू होण्याच्या अगोदर बॉयलर पूजन व मोळी पूजनाच्या दिवशी सर्वसाधारण सभेत सभासद व शेतकरी यांनी गोंधळ घालावा यासाठी सर्वसाधारण सभेच्या अगोदर विविध गावांमध्ये सभांची आयोजने केलेली होती. काही ठिकाणी थकीत बिल नसणारे सभासदांची सुद्धा गर्दी होती. मीटिंग संपल्यानंतर हात वर करून नेते व सभासद यांची मीटिंग यशस्वी झाल्याचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले जात होते. मात्र, सभासदांना कारखाना सुरू राहिल्यानंतर चालू व थकीत बिल मिळत आहे. कारखाना परिसरातील छोटे मोठे व्यापारी दळणवळण व उद्योग व्यवसाय सुरळीत चालल्याने गत वैभव प्राप्त होत आहे, अशी धारणा झालेली असल्याने सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी विरोधकांना हुल दिली. त्यांच्या हूलीला कोणीही बळी पडलेले नाही. विरोधकांची बत्ती गुल झालेली आहे.

सर्वसाधारण सभा थंडे थंडे कुल कुल अशी होऊन सध्या कारखाना सुस्थितीत सुरू असून वाहनांची रेलचेल सुरू झालेली आहे. कारखाना वाहनांनी आवश्यक फुल झालेला आहे. कारखान्याचे चेअरमन आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील व कारखान्याचे आजी माजी संचालक, सभासद, हितचिंतक यांनी शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाला पायी चालत जाऊन पहिल्या साखर पोत्यातील नैवेद्य दाखवून आशीर्वाद घेतलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button