श्री सावतामाळी विद्यालय, माळेवाडी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची आर्मीमध्ये निवड
अकलूज (बारामती झटका)
श्री सावतामाळी विद्यालय, अकलूज माळेवाडी मधील माजी विद्यार्थी चि. अक्षय निकम व जि. प. प्रा. शाळा माळेवाडीमधील माजी विद्यार्थी चि. स्वप्निल फुले यांची आर्मी भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल शनिवार दि. १२/११/२०२२ रोजी विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती मा. श्री. नामदेव गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पोटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. श्री. गणपत राऊत, मा. श्री. नारायण बोडके, मा. श्री. सदानंद फुले, मा. श्री. उमेश एकतपुरे, ग्रामस्थ शिंदे, निकम जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नकाते सर, श्री सावतामाळी विद्यालय व जि. प. प्रा. शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाचे सभापती मा. श्री. नामदेव गलांडे तसेच सर्व सदस्य यांनी आर्मीत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सुजाता शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. डामसे सर यांनी केले तर श्री. हाके सर यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
