आरोग्यताज्या बातम्या

संत माणकोजी महाराज यांचे वंशज ह.भ.प. डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न होणार.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेवराव ठवरे पाटील यांचे पिताश्री स्वर्गीय विठोबा शाबाजी ठवरे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन पुष्पवृष्टी आरती व महाप्रसादाचे आयोजन.

खुडूस ( बारामती झटका )

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री नामदेवआप्पा ठवरे पाटील यांचे पिताश्री खुडूस गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय विठोबा शाबाजी ठवरे पाटील उर्फ आबा यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त सोमवार दिनांक 10/07/2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये संत माणकोजी महाराज यांचे वंशज ह भ प डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे कीर्तनानंतर पुष्पवृष्टी आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक नामदेवराव ठवरे पाटील, खुडूस गावचे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच विनायक नामदेव ठवरे पाटील, नागपूर महापौर केसरी पैलवान सुरज नामदेव ठवरे पाटील उदोयोग पती सारंग नामदेव ठवरे पाटील , स्वागत महादेव ठवरे पाटील, डॉ. विक्रम महादेव ठवरे पाटील पै. चेतन महादेव ठवरे पाटील व समस्त ठवरे पाटील परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button