सदाशिवनगर पुरंदावडे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या भूमिपुत्रांचा घोड्यावरून मिरवणूक काढून सन्मान सोहळा संपन्न होणार..

श्रीक्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन..
पुरंदावडे (बारामती झटका)
पुरंदावडे ता. माळशिरस येथील श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने सदाशिवनगर पुरंदावडे गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवार दि. 15/07/2023 रोजी ठीक सायंकाळी 04.00 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदान, सदाशिवनगर, मैदानासमोर हरिभाऊ पालवे यांच्या निवासस्थाना पासून घोड्यावर वाजत गाजत पुरंदावडेगावा मधून भव्य मिरवणूक कडून गावातील हनुमान मंदिर व सर्व देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन पुरंदावडेगावचे ग्रामदैवत श्रीमहालक्ष्मी देवीच्या प्रांगणामध्ये भव्य मिरवणूकीची सांगता होऊन सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.तसेच सत्कार सारंभा नंतर अनेक मान्यवरांची मनोगते होणार आहेत. गावातील विजयश्री भूमिपुत्र त्यामध्ये कनिष्ठ अभियंता शुभम शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मयूर सुळे पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल सोनटक्के, मंडळ कृषी अधिकारी मारुती ओवाळ, चार्टर अकाउंटंट शिवम नाळे, महाराष्ट्र पोलीस मनोज गाजरे, महाराष्ट्र पोलीस विजश्री बनकर यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
तरी सदरच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक, समस्त ग्रामस्थ सदाशिवनगर व पुरंदावडे यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng