ताज्या बातम्यासामाजिक

सदाशिवनगर येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली…

बँकेतील लॉकर तोडून सोने व रोख रक्कम लंपास केलेली असणार आहे पोलीस पथक बँकेत दाखल झालेले आहे.

सदाशिवनगर ( बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस, येथील पुणे पंढरपूर रोडवरील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सदाशिवनगर शाखेतील अज्ञात चोरट्याने तिजोरी लॉकर तोडून जबरी चोरी करून सोने व रोख रक्कम घेऊन गेलेले आहेत. सध्या अधिकारी व माळशिरस पोलीस स्टेशनचे अधिकारी बँकेत आलेले आहेत.

मध्यवर्ती ठिकाणी चोरांनी बँकेवर सोमवारी रात्री डल्ला मारलेला असल्याने वाऱ्यासारखी बातमी पसरलेली आहे. पोलीस स्टेशन व बँक अधिकारी बँकेत आहेत. कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर चोरीमध्ये चोरांनी किती मुद्देमाल लंपास केला याची माहिती मिळणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button