समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते विकास सोसायटीच्या सभासदांना 13 टक्के लाभांशाचे वाटप.
कर्ज वसुलीची सोसायटीचे दरवर्षी १०० टक्के वसुलीची परंपरा कायम.
नातेपुते ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील नातेपुते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना संस्थेचे माजी चेअरमन व मार्गदर्शक समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला होता. या लाभांशाचे वाटप नातेपुते विकास सोसायटीच्या कार्यालयात विविध मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.
सदर सोसायटीची दरवर्षी शंभर टक्के वसुलीची परंपरा कायम आहे. या संस्थेचा आदर्श इतरही संस्थेने व सभासदांनी घेण्याची गरज आहे.
यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील म्हणाले की, नातेपुते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही १४ ऑक्टोबर १९६० रोजी स्थापन झाली असून संस्था प्रत्येक वर्षात नफ्यात आहे. संस्था पातळीवर व बँक पातळीवर कर्जाची दरवर्षी १०० टक्के वसुली असते. कर्ज वसुली चांगल्या प्रकारची असल्याने संस्थेस चांगला नफा मिळाला. संस्थेला कायम ‘अ’ वर्ग आहे. सभासदांना यावर्षी १२ टक्के लाभांश देण्यात आला. कोरोनाच्या खडतर परिस्थितीत सभासदांनी संस्थेस कर्ज भरून चांगले सहकार्य केले, असेही ते म्हणाले.
यावेळी धुळदेव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजयतात्या पाटील, संचालक शिवाजी अर्जुन, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नातेपुते नगरपंचायतचे बांधकाम सभापती अतुलबापू पाटील, चेअरमन अजेश पांढरे, व्हा. चेअरमन सोमनाथ बंडगर, नगरसेवक रणजित पांढरे, नगरसेवक आण्णासो पांढरे, संचालक बाळासाहेब काळे, बळवंत पांढरे, रामदास पांढरे, माणिक पांढरे, बाळासो बोराटे, दत्तात्रय ठोंबरे, अशोक मिसाळ, नागरबाई राऊत, बायडाबाई पांढरे, सचिव अमोल गोडसे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.