सर्वसामान्य शेतकरी व सभासद बांधवांचा विजय आहे : अभिजीत पाटील.
पंढरपूरच्या राजवाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा विश्वास व्यक्त केला.
पंढरपूर ( बारामती झटका )
हा विजय संपूर्ण विठ्ठल परिवाराचा आहे. हा विजय सर्वसामान्य शेतकरी बांधवांचा आहे. सर्व श्रेय त्यांचेच आहे. हा विजय लोकशाहीचा आहे, असे मत अभिजीत पाटील यांनी बारामती झटक्याशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना उद्योजक अभिजीत पाटील म्हणाले कि, हा विजय विठ्ठलाची सेवा समजून आजवर जे समाजकार्य केले त्याचा आहे. हा विजय दिवसरात्र काम करून रक्ताचे पाणी करणाऱ्या माझ्या तरुण सहकारी व कार्यकर्त्यांचा आहे. तसेच पॅनल मधील सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीचा आहे. हजारो ज्येष्ठ सभासद, माता-भगिनी यांचे आशीर्वाद आणि कुटुंबीयांचे खंबीर पाठबळ यामुळे हा विजय प्राप्त झाला. विठ्ठल परिवाराने दाखवून दिले की जेव्हा जेव्हा परिवर्तन आवश्यक असते तेव्हा विठ्ठल परिवार एकजूट होतोच. आपणा सर्वांच्या साथीने, सहकार्याने पंढरपूरच्या या राजवाड्यास पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng