Uncategorizedताज्या बातम्या

सहकार शिरोमणी विरोधकांना एकही जागा देणार नाही – कल्याणराव काळे

७४ उमेदवारांकडून ८९ अर्ज दाखल

पंढरपूर (बारामती झटका)

सहकार शिरोमणी साखर कारखाना लढवण्यासाठी आता तयारी ठेवली आहे. मात्र, विरोधकांनी नुसती गलगल सुरू केली आहे. आम्ही स्वतःच्या संपत्ती गहाण ठेवून सर्व देणे देण्याची सोय केली आहे. एवढा सभासद वर्ग माझ्यासोबत दिसत असताना विरोधकांना जागा देण्याचा प्रश्नच नसल्याचे कल्याणराव काळे म्हणाले.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये मंगळवारी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालयाच्या दरम्यान मोटरसायकल रॅली काढण्यात आली. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अखेर ७४ उमेदवारांनी ८९ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाळवणी गट २५, भंडीशेगाव १६, गादेगाव ९, कासेगाव ४, सरकोली ११, सहकारी संस्था गट २, अनुसूचित जाती जमाती १, महिला राखीव ५, इतर मागासवर्ग प्रतिनिधी २, भटक्या विमुक्त जाती जमाती ५ असे ८० अर्ज दाखल झाले आहेत.

यावेळी भगीरथ भालके, उत्तम नाईकनवरे, महादेव देठे, राष्ट्रवादी उद्योग, व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, संचालक सुधाकर कवडे, बिभीशन पवार, बाळासाहेब कौलगे, गोरख जाधव, पांडुरंग कौलगे, शहाजी साळुंखे आदी उपस्थित होते.

पवारांच्या बैठकीतही तोडगा नाही
सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी काळे गटाला विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील, माजी संचालक दीपक पवार यांनी आव्हान दिले आहे. सत्ताधारी गटाकडून सर्व विरोधकांना एकत्र आणून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत बैठक होऊनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort