सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांची पुण्यतिथी संपन्न
कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते कै. सूर्यकांत दादा माने देशमुख यांची पुण्यतिथी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन वेळापूर विकास कार्यकारी सेवा सोसायटी संस्था मर्या., अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय आणि सूर्यकांतदादा पतसंस्था, वेळापूर यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील आणि कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आनंदराव माने देशमुख, दत्तात्रय बनकर, आर. के. आबा, विठ्ठल मुंगूसकर, मधुकर इंगळे, शरद साठे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव माने देशमुख हे होते. यावेळी गोपाळराव घाग्रे, उदय उरणे सर, गणेश चव्हाण, प्रभाकर इंगळे, कमलाकर तात्या माने देशमुख, अण्णा चव्हाण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग भाऊ माने देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष अमृतभैय्या माने देशमुख, बाळासाहेब जोशी, ग्रामपंचायत सदस्य अमृतराव माने देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपकआबा राऊत, ग्रामपंचायत सदस्य पनासे, ग्रामपंचायत सदस्य दीपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गायकवाड, पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख, युवराज राजेभोसले, मल्हारी मामा शिंदे, माळी साहेब, शिवाजी मोहिते, शरद साठे, दिगंबर साठे, नितीन चौगुले, धनुभैया माने देशमुख, माजी उपसरपंच काकुळे साहेब, भैय्या इनामदार, रंगादादा माने, किसन बनकर, चंद्रकांत आडत ,शरद साळुंखे, भैया गिरमे, गिरीश कुलकर्णी, अभिजीत म्हेत्रे, माऊली म्हेत्रे, शंकर माने देशमुख, सतीश नवले, श्रीकृष्ण देशपांडे तसेच संस्थेचे सर्व संचालक, सूर्यकांत दादा पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ, निवृत्त शिक्षक गिरमे सर, माने सर, संस्थेचे सचिव भागवत मिले, क्लार्क शिवाजी आडत, अशोक साबळे, संजय करमाळकर, अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाणपोईचे उद्घाटन संस्थेच्या वतीने पांडुरंग भाऊ माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक श्रीधर देशपांडे यांनी केले तर आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng