सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. दत्तामामा भरणे यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली..
मांडवे (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री इंदापूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांनी माळशिरस विधानसभेचे भाजपचे आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे ५० फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शुक्रवार दि. ३० जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता सांत्वन पर भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. २६/०६/२०२३ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळ गावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी क्रियाकर्म करून शुक्रवार दि. ३०/०६/२०२३ रोजी सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.
सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार दत्तामामा भरणे यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळेस त्यांच्यासोबत डॉ. सुनील काका पाटील, काँग्रेसचे नेते प्रकाशबापू पाटील, माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षयभैया भांड, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव अभिषेक पाटील, युवा नेते करण भैया पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was both informative and hilarious! For further reading, check out: LEARN MORE. Any thoughts?