Uncategorized

हिवरवाडीच्या विकासात राजेंद्र मेरगळ यांचा सिंहाचा वाटा – राजूशेठ शियाळ

करमाळा (बारामती झटका)

पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या काळात राजेंद्र मेरगळ यांनी लाखो रुपयांची विकासकामे हिवरवाडीमध्ये करून दाखवली. शिवाय गावातील जलयुक्त शिवाराची कामे करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपक्रम आखले, असे मत प्रसिद्ध व्यापारी राजू शेठ शियाळ यांनी व्यक्त केले. हिवरवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी शियाळ बोलत होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, मिलनसेठ जपे, युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, तेजवार्ताचे संपादक विशाल परदेशी, शिवसेना वैद्यकीय कक्ष समन्वयक नागेश शेंडगे, दिलीप सुळ, चंदू चव्हाण, शिवसेना हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आदी उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र मेरगळ यांनी येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी नागेश शेंडगे यांनी यावेळी केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Great article! The depth of analysis is impressive. For those wanting more information, visit: LEARN MORE. Looking forward to the community’s thoughts!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button