अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होणार.
राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरवणार का ? माळशिरस तालुक्याच्या जनतेला लागली उत्कंठा.
अकलूज ( बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या बाजार समितीची सन 20-22 23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 30/09 /20 23 रोजी दुपारी ठीक 04 वाजता बाजार समितीचे शंकरराव मोहिते मुख्य मार्केट यार्ड अकलूज येथे विषयांचा विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली असल्याचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी जावक क्रमांक वार्षिक सभा 421/ 20 23- 24 या पत्राने कळविलेले आहे.सदरच्या पत्रामध्ये दिनांक 30/0 9 2022 रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रशिक्षण वाचून मंजूर करणे, सन 2022-23 चे वार्षिक तेरीज उत्पन्न खर्च पत्रके व ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे, सन 2020-23 चे वार्षिक अहवालाची माहिती घेणे सन 2022- 23 चे लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेणे, अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे असे 5 विषय आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभा सन 2022 – 23 चे कागदपत्र सभे पूर्वी एक दिवस अगोदर पाहण्यासाठी उपलब्ध होतील अशी टीप टाकलेली आहे.अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून सत्ताधारी मोहिते पाटील गटाची एक हाती सत्ता होती मासिक व सर्वसाधारण सभा एकमताने विषय मंजूर होऊन शांततेत होत होती मात्र निवडणुकीत माळशिरस तालुका विकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने संचालक झालेले आहे त्यामुळे मासिक व सर्वसाधारण सभा वादळी व गोंधळाची होणार असल्याचे माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे सध्या तरी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संचालकांना आलेली आहे सभासद यांना तोंडी अथवा लेखी आमंत्रण येईल किंवा नाही याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng