क्रीडाताज्या बातम्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी उत्सव २०२३ राष्ट्रवादी युवक चषक स्पर्धेचे आयोजन

आ. दत्तात्रयमामा भरणे यांच्या शुभहस्ते तर प्रतापआबा पाटील, अर्जुन देसाई, प्रवीणभैय्या माने, ॲड. सचिन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न

इंदापूर (बारामती झटका)

इंदापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर यांच्या वतीने दहीहंडी उत्सव २०२३ निमित्ताने राष्ट्रवादी युवक चषक स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. १४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता महादेव मंदिर परिसर, बेलवाडी, ता. इंदापूर, येथे करण्यात आले आहे. तर यावेळी प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापआबा पाटील, नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, माजी सभापती आरोग्य व बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुण्याचे प्रवीण भैय्या माने, बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ हे असणार आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रयमामा भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेरचे आमदार निलेश लंके, मोहोळचे आमदार यशवंततात्या माने, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर हे असणार आहेत. तर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध नृत्यांगना जुही शेरकर व शबनम पुणेकर या असणार आहे.

राष्ट्रवादी युवक चषक स्पर्धेचे स्पर्धेमध्ये १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक जय श्रीराम प्रतिष्ठान योद्धा ग्रुप, डी .एस. ग्रुप, जय महाराष्ट्र प्रतिष्ठान, शिवस्वराज्य प्रतिष्ठान, झेड.पी. ग्रुप, वक्रतुंड ग्रुप, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

 1. I know this if off topic but I’m looking into starting my own blog and
  was wondering what all is needed to get set up?

  I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny?

  I’m not very web smart so I’m not 100% positive.
  Any suggestions or advice would be greatly appreciated.
  Kudos

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button