अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात….. #अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती #मोहिते पाटील विरोधी गट
सत्ताधारी मोहिते पाटील विरोधी गटाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात “एकच फाइट वातावरण टाइट”..
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दि. २७/०३/२०२३ पासून ते दि. ०३/०४/२०२३ पर्यंत उमेदवारी दाखल करावयाची आहे. सत्ताधारी मोहिते पाटील विरोधी गटाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली असून ‘एकच फाइट, वातावरण टाइट…” अशी माळशिरस तालुक्यात निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल दि. २७/०३/२०२३ ते दि. ०३/०४/२०२३, छाननी दि. ०५/०४/२०२३, उमेदवारी अर्ज माघारी ६ ते २०, मतदान २८ तारखेला तर मतमोजणी २९ तारखेला होणार आहे. सोसायटी मतदार संघात १८२२ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात ११५१, व्यापारी मतदार संघात ४११, हमाल तोलार मतदारसंघात २०३ असे मतदार आहेत. सोसायटी मतदार संघातून ११ संचालक ग्रामपंचायत मतदार संघातून ४ संचालक, व्यापारी मतदारसंघातून २ तर हमाल तोलार मतदारसंघात १ असे १८ सदस्य निवडणूक रिंगणात उतरतील.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शेतकरी यांना सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघात उभा राहण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाने मिळालेली असल्याने माळशिरस तालुक्याच्या निवडणुकीत रंगत वाढलेली आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटाचे विरोधी गटामध्ये रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. हमाल तोलार व व्यापारी मतदार संघामध्ये सत्ताधारी गटाचे प्राबल्य राहील. मात्र, सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र पाहावयास मिळणार आहे. शेतकऱ्याच्या नावे दहा गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला निवडणुकीमध्ये उभे राहता येणार आहे. त्यामुळे सोसायटीचा सदस्य अथवा ग्रामपंचायत सदस्य नसतील तरीसुद्धा शेतकऱ्यांना आपले नशीब आजमावण्याकरता संधी मिळालेली आहे. निश्चितपणे विरोधी गटाकडून या संधीचे सोने होणार आहे. लवकरच उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. सहाय्यक निबंधक संस्थेचे सहाय्यक निबंधक एम.एल. शिंदे साहेब हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very insightful article! Its great to see such well-researched content. Lets talk more about this. Click on my nickname!