Uncategorizedताज्या बातम्या

अकलूज ते म्हसवड व्हाया माळशिरस, सदाशिवनगर, जाधववाडी, कन्हेर, इस्लामपूर, मांडकी, जळभावीमार्गे जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवा..

अकलूज, माळशिरस, सदाशिवनगर, जाधववाडी, कन्हेर, इस्लामपूर, मांडकी, जळभावी, म्हसवड परत सदाशिवनगर मार्गे जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या वाढवा, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींची मागणी

माळशिरस (बारामती झटका )

अकलूज आगारातील अकलूज ते म्हसवड व्हाया माळशिरस, सदाशिवनगर, जाधववाडी, कन्हेर, इस्लामपूर, मांडकी, जळभावी मार्गे परत सदाशिवनगर मार्गे बंद पडलेल्या गाडीचा फेरा सुरू झालेला आहे. याबद्दल श्री. मामा वाघमोडे, अध्यक्ष शिवाजी जाधव, देविदास सूर्यवंशी, हनुमंत जगदाळे, जगन्नाथ सूर्यवंशी, दयानंद शिंदे, नाना लांडगे, राजू दोलतडे, संतोष खरात व शिक्षक आणि जाधववाडी ग्रामस्थांनी एसटी बसचे पूजन करून चालक वाहक यांचे अभिनंदन करून अकलूज आगाराचे व्यवस्थापक श्री. पोपळे साहेब यांचे आभार मानले. मात्र सदर गाडीच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी मार्गावरील गावातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींची आहे.

अकलूज ते म्हसवड व्हाया सदाशिवनगर मार्गे जाणारी एसटी बस गोरडवाडी मार्गे जात होती. अनेक दिवस सदर गाडीचा मार्ग पूर्वीप्रमाणे सुरू करावा, अशी मागणी मार्गावरील गावातील लोकांनी केलेली असल्याने अकलूज आगाराचे विभाग प्रमुख पोकळे साहेब यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार गोरडवाडीमार्गे जाणारी एसटी पुन्हा सदाशिवनगर मार्गे दि. 01/08/2022 पासून सुरू केलेली आहे. मार्गावरील ग्रामस्थांनी व शिक्षकांनी स्वागत केलेले आहे.

म्हसवड अकलूज सदाशिवनगर मार्गे जाणाऱ्या गाडीचे फेरे सकाळी 07 दुपारी 01 व सायंकाळी 05 अशा वेळेमध्ये सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींची अडचण दूर होणार आहे.

गेली दोन वर्ष शाळा ऑनलाईन होती. त्यामुळे एसटी बसच्या फेऱ्या बंद होत्या, तरी अडचण नव्हती. सध्या शाळा ऑफलाईन सुरू झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जावे लागत आहे‌. गोरगरीब व सर्व सामान्य घरातील विद्यार्थी असल्याने त्यांना एसटी बस शिवाय पर्याय नाही. प्रवासी वाहतूक करणारे टमटम सुद्धा बंद आहेत. येण्या जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे एक फेरा सुरू केलेला आहे‌.

त्याबद्दल सर्वच गावातून आगार प्रमुख व चालक वाहक यांचे अभिनंदन करून तीन फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. यासाठी गावातील आजी माजी सरपंच, तालुक्यातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विद्यमान खासदार, आमदार यांनी लक्ष द्यावे अशी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांची मागणी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button