Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

अष्टपैलू १९८९-१९९० मधील १२ विज्ञान बॅचचा ३२ वर्षानी स्नेहमेळावा संपन्न…

अकलूज (बारामती झटका)

सदाशिवराव माने विद्यालय, अकलुज सन १९८९-९० सालच्या १२ वी विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा स्नेह मेळावा ३२ वर्षाच्या खंडानंतर डॉ. बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या कन्येचा साखरपुडा समारंभाचे औचीत्य साधून स्वराज्याचे अमृत महोत्सवात शुक्रवार दि. ०७/०४/२०२३ रोजी १२ ते ५ या वेळेत राजेशाही सुविधा, खवय्यांच्या जीभेचे लाड पुरविणाऱ्या शाही बैठक व्यवस्था असलेल्या चेहिता रिसोर्ट अकलुज येथे संपन्न झाला.

या स्नेहमेळाव्यास ५० माजी विद्यार्थी विद्यार्थीनीनी स्नेहपूर्वक सहभाग नोंदवून जून्या आठवणी, प्रसंग, शिक्षा, पाठीवरील थाप, सद्य परिरिस्थिती, नोकरी, मुले, यश, प्रशंसा, सत्कार, भावना, उल्लेखनीय कार्य सर्वाना शेअर केले. ह्या बॅचचे वैशिष्ट म्हणजे सर्वच माजी विद्यार्थी या भारत देशाचे सुजान नागरिक झाले असून त्यांचे शिक्षण, अर्थकारण, राजकारण, समाजकार, शेती क्षेत्र, वैद्यकिय क्षेत्र, आभियांत्रीकी, औषध शास्त्र, सेवा, कृषि क्षेत्र, अर्थ विभाग, पशुवैद्यकिय विभाग, व्यापार, अभिनय, व्यवसाय, व्यवसाय, प्रशासन इत्यादी क्षेत्रात विशेष प्राविण्यासह समाजकारणासह सेवा पुरवित असून वरील क्षेत्रात नावलौकीक मिळवीला आहे.

सदर स्नेह मेळाव्यास श्री. कोरेकर सर, श्री. गुरुगुळे सर, श्री. राऊत सर, श्री. एल. डी. बाबर, श्री. बी. व्ही. बाबर, श्री. देशमुख सर, श्री. पाटील सर, श्री. घाटगे सर या पुण्यनीय, पुज्यनीय आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या गुरुवर्यानी सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित गुरुजणांचा यथोचीत शाल, स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छसह सन्मान करण्यात आला. उपस्थितीत विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गुरुजनांवरील प्रेम व स्नेहाचे प्रतिक गुलाब पुष्प देऊन हलगीच्या १००१ नादासह जंगी राजेशाही स्वागत करण्यात आले.

गुरुवर्यांनी मार्गदर्शनपर हितगुजामध्ये ह्या ९० बॅचसारखी आज्ञाधारक, असाधारण, कष्टाळू, शिस्तप्रय, अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले उत्तुंग यश, मान, किर्ती संपादन केलेली बॅच असलेबाबत प्रत्येक गुरुजनांनी उल्लेख केला व शुभ आर्शीवाद दिले. कार्यक्रमाचे नेटके नियोजन आयोजन श्री. जाकिर पठाण, श्री. सतिश कचरे, श्री. भाऊसाहेब लावंड, श्री. प्रविण लोंढे, श्री. राजू जाधव, श्री. सुभाष मुंडफणे यांनी केले. कार्यक्रमास सर्व मित्र, मैत्रीणीसह डॉ. विनोद शेटे यांचे विशेष सहाय्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सुभाष मुंडकणे यांनी केले व श्री. अमरीश कदम यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button