ताज्या बातम्यासामाजिक

संपादक पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद – पोलीस निरिक्षक दिनेश तायडे

पत्रकारांसाठी हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

बारामती (बारामती झटका)

माणसांची मानसिकता अशी झाली आहे की, जेव्हा गाडी बंद पडेल तेव्हाच गॅरेजला घेऊन जातो. जर रेग्युलर चेकअप केलं तर बॉडी कमी डॅमेज होते, असे प्रतिपादन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांनी केले.

संपादक पत्रकार संघ आयोजित योध्दा प्रोडक्शन व पब्लिसिटीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामतीतील पत्रकार बांधवासाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर रुबी हाॅल क्लिनिक येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी तायडे बोलत होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन डाॅ. ऋतुराज काळे, विशाल जाधव, अॅड. शिवकांत वाघमोडे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना तायडे म्हणाले की, संपादक पत्रकार संघाने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. कामाच्या धावपळीत आपण शरीराकडे लक्ष देत नाही त्यामुळे मोठं काहीतरी होते. त्यापेक्षा वेळेवरच शरीराकडे बघितलं पाहीजे, असे तायडे यांनी सांगितले.

यावेळी ऋतुराज काळे यांनी, पत्रकार बांधव ब्रेकिंग न्यूजच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे हे शिबिर घेऊन एक चांगला कार्यक्रम हाती घेतला असुन या माध्यमातुन पत्रकार आपल्या शरीरावर लक्ष देतील, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी विशाल जाधव म्हणाले की, संपादक पत्रकार संघाचे कार्यक्रम दरवर्षी कौतुकास्पद असतात. तसेच अन्यायाविरुध्द लढा देण्याचे काम पत्रकारांकडुन केले जाते.

या शिबिरासाठी रुबी हॉल क्लिनिक डॉ. कार्तिक जाधव, संदिप अनाद, श्री महेंद्र कांबळे, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पुणे, श्रीनिवास शेलार व्यवस्थापक रूबी हॉल बारामती, तुषार सोनवणे, राहुल चांदगुडे, प्रमोद कावळे यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये एकुण ५९ पत्रकार यांनी सहभाग नोंदवुन तपासणी करुन घेतली. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संपादक पत्रकार संघाचे पदाधिकारी व सभासद वर्गाने परिश्रम घेतले. यावेळी सुत्रसंचालन नाना साळवे यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort