अकलूज येथे राज्यस्तरीय चर्मकार समाजातील वधू-वर व पालक परिचय मेळावा होणार संपन्न
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथे श्री संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय चर्मकार समाजातील वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार दि. ३१/७/२०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेमध्ये अकलूज नगर परिषदेसमोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे श्री संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक गणेश कांबळे (मो. ८९७५८९९९०९) आणि संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे अध्यक्ष हर्षद भोसले (मो. ९६२३६८७८८५) यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
सदर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे, सोलापूर जिल्हा परिषद संस्था फाउंडेशनचे दत्तात्रय तात्यासाहेब खरतडे, इंदापूरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, राष्ट्रीय मानव अधिकारचे रमेश गणगे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवा नियुक्ती उपसंचालक आरोग्य सेवाचे सुभाष कांबळे, भ.ज.आ. संघटना सं. प्रमुख संतोष कांबळे, श्री गुरु रविदास महाराज भोईजे टेंभुर्णी मंदिर चे संस्थापक राजाभाऊ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी भोसले, राष्ट्रीय चर्मकार महासंघ मा.ता. अध्यक्ष विनायक भगत, पंकज बनसोडे, एडवोकेट सचिन लोखंडे, अध्यक्ष आबा शिंदे हे असणार आहेत.
तर प्रमुख उपस्थितीत बारामती येथील समाजसेविका निर्मला ननवरे, महूदचा ग्रामपंचायत सदस्या पारूबाई कांबळे, संत रोहिदास फाउंडेशनचे उपाध्यक्ष परमेश्वर उनवणे, सचिव पांडुरंग कांबळे, साप्ताहिक पोलीस ऑफिसर महान्यूज पंढरपूरचे पत्रकार ज्योतीराम कांबळे, माजी सरपंच रतिलाल बनसोडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सांगोला तालुका अध्यक्ष किरण डांगे, संचालक शरद कांबळे हे असणार आहेत.
सदर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त इच्छुकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic article! Your perspective on this topic is truly insightful. For those looking to explore this further, I found an excellent resource that complements your points: READ MORE. I’m eager to hear what others think about this!