कृषिरत्न राजेंद्रदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रिव्हाॅल्युशनरी मराठा एन्त्राप्रेनीअर असोसिएशनचा स्नेह मेळावा होणार संपन्न
सोलापूर (बारामती झटका)
उद्योजकांचे संघटन करणे, नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करणे, कौशल्य विकासावर मार्गदर्शन करणे, औद्योगिक कौशल्य वाढवणे व त्यांना जागतिक बाजारपेठेसोबत राहण्याकरता मार्गदर्शन करणे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या रिव्हाॅल्युशनरी मराठा एन्त्राप्रेनीअर असोसिएशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला स्नेह मेळावा शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मयूर मंगल कार्यालय, विजापूर रोड, सोलापूर येथे कृषीरत्न राजेंद्रदादा पवार अध्यक्ष, बारामती ॲग्रो लिमिटेड, अध्यक्ष, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी उद्योजक, व्यवसाय यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिव्हाॅल्युशनरी मराठा एन्त्राप्रेनीअर असोसिएशनचे अध्यक्ष नीलकंठ वाघचौरे, संस्थापक अध्यक्ष सुनील फुरडे, उपाध्यक्ष रोहन देशमुख, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव सिद्धाराम वाघ, खजिनदार अभिनव साळुंखे, मेंबरशिप वृद्धी कमिटीचे चेअरमन माऊली पवार, सह खजिनदार अतुल लोंढे, मेंबरशिप वृद्धी कमिटीचे व्हाईस चेअरमन संजय पवार व सर्व सभासद यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.