ताज्या बातम्या

चि. सौ. कां. ज्ञानेश्वरी गाडेकर (पवार) व चि. कृष्णा थोरात (खुळे) यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक – श्री. नारायण परशुराम गाडेकर (पवार), श्री. आबासाहेब नारायण गाडेकर (पवार) रा. संगम ता. माळशिरस

संगम (बारामती झटका)

श्री. नारायण परशुराम गाडेकर (पवार) यांची नात व स्वर्गीय भारत नारायण गाडेकर (पवार) रा. संगम, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. ज्ञानेश्वरी गाडेकर (पवार) आणि स्वर्गीय ह. भ. प. जनार्धन बाजीराव थोरात (खुळे) यांचे नातू व श्री. शंकर जनार्धन थोरात (खुळे) रा. वडापुरी, ता. इंदापूर, यांचे ज्येष्ठ चिरंजीव कृष्णा थोरात (खुळे) यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. 21/12/2023 रोजी सकाळी 11 वाजून 48 मिनिटे या शुभ मुहूर्तावर गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवे पाटी, अकलूज-टेंभुर्णी रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे लग्नकार्याचे प्रेषक श्री. नारायण परशुराम गाडेकर (पवार), श्री. आबासाहेब नारायण गाडेकर (पवार) यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

सप्तपदीच्या पवित्र बंधनाने नव संसाराची वाटचाल करण्यास निघालेल्या नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्य यावे, यासाठी आपणांस निमंत्रण दिलेले आहे. लग्नाच्या घाईगडबडीत हस्ते पर हस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे स्वागतोत्सुक – संगमचे माजी सरपंच श्री. बाळासाहेब माणिकराव जाधव, श्री. मारुती शिवदास महाडिक पाटील, श्री. सुरेश बाबुराव वाघ पाटील, कार्यवाहक – श्री. आनंद उर्फ दादा दिलीप जाधव (मामा), श्री. राहुल बाळासाहेब जाधव (मामा), श्री. स्वप्निल रवींद्र जाधव (मामा) यांच्यासह समस्त गाडेकर (पवार) परिवार संगम यांच्यावतीने लग्नकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button