मळोली येथील श्रीमती शकुंतला अंबादास जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, येथील श्रीमती शकुंतला अंबादास जाधव यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार दि. 25/07/2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
स्वर्गीय अंबादास माधवराव जाधव पाटील यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. उभय दांपत्य यांना आपत्य नसल्याने बंधू सोपानराव जाधव पाटील यांचे पुत्र डॉ. संभाजीराव जाधव पाटील यांना दत्तक घेतलेले आहे. डॉ. संभाजीराव जाधव पाटील यांनी अंतिम संस्कार केलेले आहेत. त्यांचा तिसरा रक्षा विसर्जन शनिवार दि. 27/07/2024 रोजी सकाळी 7.30 वाजता मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.

जाधव पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.