Uncategorized

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्रद्धा जवंजाळ तर सचिव पदी डॉ. अर्चना गवळी


अकलूज ( बारामती झटका )

सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या अकलूज इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्रद्धा राहुल जवंजाळ तर सचिव पदी डॉ. अर्चना सचिन गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळत्या अध्यक्षा मेघा जामदार या होत्या. नूतन अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना मावळत्या अध्यक्षा मेघा जामदार यांनी चार्टर आणि लेपल पिन देऊन अध्यक्षपदाचा कार्यभार सुपूर्द केला, तर नूतन उपाध्यक्ष डॉ. अर्चना गवळी, संयुक्ता दोशी, ट्रेजरर मृणाल दोशी, आयएसओ अमोलीका जामदार, एडिटर सारंग गिरमे व सीसी रश्मी शहा यांनाही लेपल पिन प्रदान करण्यात आल्या.

अकलूज येथे इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना मावळत्या अध्यक्षा मेघा जामदार यांनी वर्षभर राबवलेले उपक्रम आणि आलेले अनुभव सांगून नूतन अध्यक्षा डॉ‌. श्रद्धा जवंजाळ यांना पुढील कारकिर्दीत होणाऱ्या कार्यक्रमास शुभेच्छा देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्षांनी वर्षभरातील नियोजित उपक्रमांची माहिती सादर केली. यामध्ये जिल्हा परिषदेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, याचबरोबर वर्षभरात विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन सांगून आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रमांवर भर देण्यात येणार असून महिला सक्षमीकरण, पर्यावरण, वृक्षारोपण आदीसह गरजू महिलांना उदरनिर्वाहासाठी मदत केली जाईल असे सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button