गिरझणीच्या स्वराज पालकर याने केले केंद्रीय माध्यमिक शाळांत CBSE परीक्षेत घवघवीत यश संपादन
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या दूरदृष्टीचा विज्ञान युगात विद्यार्थ्यांना शिक्षणातील उद्दिष्ट गाठता येत आहे.
अकलूज ( बारामती झटका )
गिरझणी ता. माळशिरस गावचा सुपुत्र ग्रीन फिंगर्स स्कूल, शंकरनगर अकलूजचा विद्यार्थी स्वराज सतीश पालकर याने केंद्रीय माध्यमिक शाळा CBSE परीक्षेत 90% मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केलेले आहे.
इंग्रजी माध्यम भविष्यामध्ये काळाची गरज होईल, अशी काळाची गरज ओळखून माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या दूरदृष्टीचा विज्ञान युगात विद्यार्थ्यांना शिक्षणातील उद्दिष्ट गाठता येत आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, मुंबई अशा मोठ्या शहरांत न जाता अकलूजसारख्या ग्रामीण भागात लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील आणि डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन व पालकर परिवार यांचे एकनिष्ठ व घनिष्ठ संबंधामुळे प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणामध्ये स्वराज याने यश संपादन केले.

गिरझणी येथील सौ. जानकाबाई व श्री. संभाजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असणारे दांपत्य. त्यांना पाच मुले आणि दोन मुली. त्यापैकी सतीशनाना पालकर यांचा भावाबहिणींमध्ये सर्वात शेवटचा नंबर आहे. प्रतिकूल परिस्थितीत सतीश नाना यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे. त्यांना जयश्री धर्मपत्नी लाभलेल्या आहेत. त्यांना एक मुलगी स्वराली आणि एक मुलगा स्वराज अशी अपत्य आहेत.

सतीश नाना पालकर घरामध्ये सर्वात लहान आहेत मात्र, प्रतिकूल परिस्थितीमध्ये लहानपणापासून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आलेली होती. चौथीमध्ये असताना वडिलांचे छत्र हरपलेले होते. आई जानकाबाई यांनी पितृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून आपल्या मुलांना वडिलांची कधीही उणीव भासू दिलेली नाही. सर्व मुले, लेकी, सुना, नातवंडे मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहत आहेत. जानकाबाई आपल्या पतीचे दुःख विसरून मुलांच्या व नातवांच्या कौतुकामध्ये नेहमी सहभागी असतात.

माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील व पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या सहकार्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात सतीशनानांनी आजपर्यंत टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सतीशनानांनी जनसेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष या पदावर काम केलेले आहे.
लहान वयामध्ये त्यांना गिरझणी गावच्या सरपंच पदी विराजमान होण्याची संधी मिळालेली होती. त्या काळामध्ये संधीचे सोने करून गावांमध्ये विकास गंगा आणलेली होती. महात्मा गांधी तंटामुक्त समितीची अध्यक्ष पदाची जबाबदारी असताना गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळवून दिलेला होता. ते सध्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील शेतकरी बँकेची चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत. सध्या काँग्रेस आय पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

गावातील व तालुक्यातील मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या अडीअडचणी व मदतीला नेहमी सतीशनाना धावून जात असतात. सतीशनानांच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत प्रतापगडाचा मोठा वाटा आहे. लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पश्चात पद्मजादेवी मोहिते पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
सतीशनाना पालकर यांनी समाजातील अनेक जबाबदाऱ्या व राजकीय पदावर काम करीत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा तेवढ्याच ताकतीने पेललेली आहे. सतीशनाना घरातील भावांच्या व बहिणींच्या मुलामुलींच्या अडीअडचणी वेळोवेळी सोडविल्या आहेत. भावांची मुले इंजिनीयर, मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत. लहान वयामध्ये नानांचे पोक्त विचार त्यांच्या अंगामध्ये आहेत.
सतीश नाना यांची कन्या स्वराली हिने महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला शंकर नगर येथे दहावीच्या परीक्षेमध्ये 93% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली होती. तिने अकरावी ए.डी. जोशी विद्यालय व बारावी जाधववाडी विद्यालय येथे पूर्ण केलेले आहे. बारावीमध्ये 91% मार्क्स मिळवून नेट परीक्षेत 412 मार्क्स मिळवून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील एम.ए मगदूम अंकली येथे बीएएमएस शिक्षण घेत आहे. बेंगलोर येथील राजीव गांधी विद्यापीठात पहिल्याच वर्षी 50 रँकच्या आत स्वरालीचा बीएएमएसमध्ये नंबर आलेला आहे.

मुलगा स्वराज पहिली ते तिसरी शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल एस एम पी धवलनगर येथे शिक्षण घेतले. सदर ठिकाणी सीबीएससी शिक्षण नसल्याने चौथीमध्ये द ग्रीन फिंगर स्कूल शंकरनगर अकलूज येथे प्रवेश घेण्यात आला. स्वराजच्या अंगामध्ये कला, क्रीडा, शिक्षण असे गुण असल्याने शाळेमध्ये हॉर्स रायडिंग, फुटबॉल, स्विमिंग, गन गेम यामध्ये नाविन्यपूर्ण खेळ करून अनेक पारितोषिके मिळविलेली आहेत. खेळामध्ये नाविन्य पूर्ण असणारा स्वराज अभ्यासामध्येही तेवढाच हुशार आहे. इयत्ता नववीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला होता. शाळेमध्ये स्कूल कॅप्टन हुशार मुलाला केले जाते. 2022 स्कूल कॅप्टन स्वराज पालकर होता. सर्व गुण संपन्न असणारा स्वराज याने केंद्रीय माध्यमिक शाळा सीबीएससी परीक्षेत 90% मार्क्स मिळवून पालकर परिवारांच्या मेडिकल क्षेत्रातील अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
सौ. जयश्री पालकर व श्री. सतीशनाना पालकर यांनी स्वराज याला पुणे येथील चाटे इंजिनिअरिंग व मेडिकल स्कूल पुणे येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे. निश्चितपणे पालकर परिवारांच्या अपेक्षा स्वराली व स्वराज पूर्ण करतील, असे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा प्रत्यय येत आहे. स्वराली आणि स्वराज यांच्या भावी शैक्षणिक कारकिर्दीसाठी बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील परिवार यांचेकडून हार्दिक शुभेच्छा !!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng