माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी दमदार कामगिरी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या विशेष प्रयत्नात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. राम सातपुते यांचा विकासकामाचा धूमधडाका.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या विशेष प्रयत्नातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा मतदार संघात विकासकामांचा धुमधडाका सुरू आहे. ग्रामीण विकासमंत्री ना. गिरीशजी महाजन यांच्याकडून सन 2022-23 आर्थिक वर्षातील ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे, 2515 या योजनेअंतर्गत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी दमदार कामगिरी सुरू आहे. विधानसभा मतदारसंघातील रुग्णांची सेवा व अडचणीतील लोकांना सहकार्य विकासकामाचा सपाटा सुरू असल्याने आ. राम सातपुते यांच्या कार्याचे रामराज्यच्या जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.


माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मौजे पिलीव येथील उपाध्ये वस्ती ओढ्यावरील फुल बांधणे 30 लाख रुपये, मौजे खुडूस 77 चौकी जवळ पुल बांधणे 25 लाख रुपये, मौजे फळवणी निरा उजवा कालव्यावर CH 177 येथे फळवणी बचेरी शिंगोर्णी जोडणारा पूल तयार करणे 25 लाख रुपये, मौजे पानीव व ग्रामपंचायत चौक ते पानीव माळशिरस रस्ता करणे 20 लाख रुपये, मौजे मळोली येथील साळमुखवाडी येथे मारुती मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 19 लाख रुपये, मौजे वेळापूर येथील 12 फाटा ते यल्लमाई मंदिरापर्यंत रस्ता तयार करणे 10 लाख रुपये, मौजे येळीव येथील मदने वस्ती रस्ता करणे व नाथ मंदिर परिसर सुधारणा करणे 10 लाख रुपये, मौजे शिंदेवाडी येथील लक्ष्मी मंदिरासमोर पत्रा शेड मारणे 10 लाख रुपये, मौजे भांब येथील संभाजी बाबा मंदिराकडे जाणारा रस्ता करणे 10 लाख रुपये, मौजे फोंडशिरस येथील आबा देवबा वस्ती ते सुलतान मळा येथे रस्ता करणे 10 लाख रुपये, मौजे तमशीदवाडी येथील शंकररत्न निवासस्थानाकडे जाणारा रस्ता करणे 10 लाख रुपये, मौजे बिजवडी येथील शिंदे वस्ती ते कदम वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, मौजे वेळापूर येथील शेरी 10 फाटा ते अमर भैया वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, मौजे मारकडवाडी येथील वश्या मारुती मंदिरा शेजारी सभागृह बांधणे 10 लाख रुपये, मौजे संग्रामनगर येथील 65 बंगला साई मंदिर समोर बंदिस्त गटार बांधणे 9 लाख रुपये, मौजे सवतगाव ग्रामपंचायत कार्यालयास संरक्षण भिंत बांधणे 9 लाख रुपये, मौजे संगम येथील संगमनगर श्रीपुर ते ग्रामपंचायत पर्यंत काँक्रीट रस्ता करणे 9 लाख रुपये, मौजे बाभुळगाव येथील दत्त मंदिरा शेजारी ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे खंडाळी येथील सांगोला रोड ते पताळे वस्ती रस्ता करणे 9 लाख रुपये, मौजे कचरेवाडी येथील सिद्धनाथ मंदिर सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे धानोरे येथील वेताळ बाबा मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे शेंडेचीच येथील महादेव मंदिर गावठाण जागेत सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे निमगाव येथील मळोली रस्ता ते यादव वस्ती रस्ता डांबरीकरण करणे 9 लाख रुपये, मौजे दसुर येथील गाव अंतर्गत काँक्रीट रस्ता करणे 9 लाख रुपये, मौजे तोंडले येथील कोडगवस्ती ते गोपाळनगर येथे रस्ता करणे 9 लाख रुपये, मौजे उघडेवाडी येथील पांढरे वस्ती ते कोरबू मळा रस्ता करणे 9 लाख रुपये, मौजे पिंपरी येथील नाथ मंदिर शिलंगणटेक येथे सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे पठाणवस्ती येथील लाडेवस्ती रस्ता डांबरीकरण करणे 9 लाख रुपये, मौजे पुरंदावडे येथील जानाई मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे इस्लामपूर येथे संभाजी बाबा मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवणे 9 लाख रुपये, मौजे भांबुर्डी येथील माळशिरस फुलेनगर कॅनल रस्ता करणे 9 लाख रुपये, मौजे गिरवी येथील बर्वे वस्ती याचे सोमलिंग मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे शिंगोर्णी येथे शनि मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे इस्लामपूर येथील भंडोबा मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे 9 लाख रुपये, मौजे मळोली येथील अकलूज सांगोला रोड घुमेरा ओढा कदम बंधाऱ्यापर्यंत रस्ता करणे 9 लाख रुपये, मौजे तामशीदवाडी येथे ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे 9 लाख रुपये, मौजे संग्रामनगर येथे रत्नपुरी 10 मध्ये बंदिस्त गटार बांधणे 8 लाख रुपये, मौजे इस्लामपूर येथील शेरे वस्ती ते धाईंजेवस्ती (पाझर टॅंक) रस्ता करणे 8 लाख रुपये, मौजे हनुमान वाडी येथील रुपनवर वस्ती ते सूर्यवंशी वस्ती रस्ता करणे 8 लाख रुपये, मौजे इस्लामपूर येथील शेरे वस्ती पीर देवस्थान रस्ता करणे 8 लाख रुपये, मौजे रेडी येथील मारुती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 7 लाख रुपये, मौजे माळीनगर येथे मारुती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक व सुशोभीकरण करणे 7 लाख रुपये, मौजे चौंडेश्वर वाडी उदयनगर गणपती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे 7 लाख रुपये, मौजे बोंडले येथील मारुती मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसवणे व रस्ता करणे 7 लाख रुपये, मौजे पिसेवाडी येथील वाघजाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 7 लाख रुपये, मौजे कोळेगाव येथील स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक बसवणे 7 लाख रुपये, मौजे मांडवे येथील 51 फाटा ते रुपनवर वस्ती येथे पाण्याची टाकी बांधणे 5 लाख रुपये, मौजे तामशीदवाडी येथील हनुमंत महादेव मोहिते वस्ती येथे विंधन विहीर व हात पंप बसविणे 5 लाख रुपये, मौजे तांबवे येथील दफनभूमीला संरक्षक भिंत बांधणे 4 लाख व काँक्रीट रस्ता करणे 4 लाख रुपये, मौजे चांदापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत पेव्हर ब्लॉक बसवणे अशा सर्व कामांसाठी पाच कोटी रुपये निधी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मंजूर केलेला आहे.


उर्वरित गावांसाठी विविध विकासकामांना 2515 मधूनच लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मुंबई येथील संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

