ताज्या बातम्याराजकारण

ढाण्या वाघ माजी आमदार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याकरता मोहिते पाटलांच्या वकिलांसह बगलबच्चांची धडपड…

“कर नाही त्याला डर कशाला”, सोलापूर जिल्हा बँकेतील बेकायदेशीर कारनामे बाहेर येऊ नये यासाठी खटाटोप..

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. सदरच्या अर्जाची छाननी सोमवार दि. 02/11/2026 रोजी अनेकांच्या अर्जावर हरकती आल्या मात्र, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जावर मोहिते पाटील गटाकडून प्रचंड हरकतींवर मोहिते पाटील गटाच्या वकिलांसह बगलबच्चांची धडपड सुरू आहे. “कर नाही त्याला डर कशाला”, सोलापूर जिल्हा बँकेतील बेकायदेशीर कारनामे बाहेर येऊ नये यासाठी मोहिते पाटील यांचा खटाटोप असल्याची जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे…

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण 201 जणांनी 238 अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन तालुक्यातील संचालक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. माळशिरस विधानसभेचे माजी आमदार ढाण्या वाघ राम सातपुते यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याने डीसीसीच्या राजकारणात चुरस निर्माण झालेली आहे. अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी 16 अर्ज दाखल झालेले आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कथित कर्ज वाटपामध्ये मोहिते पाटील यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जुने व नवे सहकारी यांच्या सहकार्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत.

माळशिरस तालुक्यात ढाण्या वाघ राम सातपुते प्रस्थापित मोहिते पाटील यांच्या विरोधात जोरदार मुसंडी मारत आहेत. राम सातपुते जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक झाल्यानंतर बँकेतील बेकायदेशीर कारनामे बाहेर येऊ नये, यासाठी मोहिते पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वकिलांची फौज उभा केलेली आहे. त्यांना स्वीय सहाय्यकासह बगलबच्च्यांची खटाटोप सुरू आहे. राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर होण्याकरता परंतु महाराष्ट्रातील ख्यातनाम विधीतज्ञ ॲड. मराठे यांनी कायदेशीर बाजू लावून धरलेली आहे. त्यांना नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ज्येष्ठ नेते ॲड. बी. वाय‌ राऊत यांचे सहकार्य आहे. मंगळवार दि‌. 03/11/2026 रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी होऊन निर्णय होणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा दिवस असल्याने महिषासुर वृत्तीचा वध करण्याकरता आई जगदंबेच्या आशीर्वादाने निश्चितपणे ढाण्या वाघ राम सातपुते कायदेशीर लढाई जिंकून उमेदवारी अर्ज वैध ठरणार, अशी सहकार क्षेत्रासह राम सातपुते समर्थकांमध्ये चर्चा सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button