ताज्या बातम्यासामाजिक
ह. भ. प. श्रीहरी महाराज नामदास यांचे चाकोरे येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. कमलताई पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
चाकोरे (बारामती झटका)
कैलासवासी कमलताई कोंडीराम पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचे आयोजन बुधवार दि. ०४/११/२०२६ रोजी चाकोरे, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह. भ. प. श्रीहरी महाराज नामदास यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
तरी या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



