घोणस / काटेरी / डंख मारणारी अळी ओळख, समज गैरसमज व व्यवस्थापन – सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी
माळशिरस (बारामती झटका)
काही दिवसापासून वृत्तपत्र, दूरदर्शन, विविध समाजिक मिडीयावरून काटेरी / घोणस अळीबाबत चर्चा, बातम्या आपल्या परिसरात दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात गैरसमज व भितीचे वातावरण झाले आहे.
ओळख – ह्या अळीच्या १३३ फॅमीली पैकी ९ फॅमीली गंभीर पॅथोफिजोलोजीकल परिस्थिती निर्माण करतात. अळी पतंग अतिशय संथ असतात. त्यामुळे परभक्षीकडून स्वतःचे संरक्षण होण्यासाठी भडक रंग त्यावर ठिपके व अंगावर काटे विकसित केलेले असतात. या काट्यामध्ये विष असते.
वावर व पिक – ही अळी प्रामुख्याने ऊस, एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, देशी बदाम तणे, कापुस, मुग, शेवगा, शोभेची झाडे यावर आढळून येते. ह्या अळ्या पानाचा भाग कुरतडून खातात. प्रार्द्रूभावामुळे नुकसान पातळी कमी असते. मनुष्य किंवा प्राणी यांचा संपर्क आल्यास मधमाश्या ज्याप्रमाणे स्वसंरक्षणार्थ डंख मारून काट्याद्वारे विष सोडतात, त्याप्रमाणे ही अळी अंगावरील काट्याद्वारे विष सोडते व काटे कातडीत रुतून राहतो. या विषामुळे त्रीव जळजळ होणे पुरळ उटणे, सुज, मळमळ, ॲलजी असेल तर श्वसनास त्रास (दूर्मिळ लक्षण ) इत्यादी लक्षणे तास दोन तास दिसतात. परंतू जीवीत हानी होत नाही, हा समज काढून टाकणे गरजेचे आहे.
उपचार – १ डंख ठिकाणचा काटा चिकटपट्टी लावून काढून टाकावा. २ – जागा साबणाने स्वच्छ धुवावी व कोरडी करावी. ३ – जागेवर रबीग अल्कोहोल लावावे. ४ – कॅलामाइन लोशन क्रीम लावावी. ५ – डंख ठिकाणी बर्फाचा तुकडा ठेवावा म्हणजे जळजळ थांबेल. ६ – शेतात काम करणाऱ्यांनी पूर्ण अंगभर कपडे परिधान करावीत. ७ – डंख ठिकाणी खाण्याचा सोडा व पाणी मिश्रण लावावे. ८ – अपवादात्मक परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला व उपचार करावेत.
अळीचे व्यवस्थापन – १ – पिकावर प्रादुर्भाव ग्रस्त शेतात कलोरो किंवा क्विनॉलफॉस 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. २ – प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात इमामेक्टोन बेझोएट ४.४ मिली प्रति १० लिटर पाण्यात स्टिकरसह फवारणी करावी.
तरी शेतकरी बांधवानी गैरसमज भिती न बाळगता वरील उपाययोजना व अळीचे व्यवस्थापन करावे हे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे आवाहन आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng