राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी युवा नेते डॉ. शशिकांत तरंगे यांची नियुक्ती…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी निवड केली..
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी युवानेते डॉ. शशिकांत तरंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डॉ. शशिकांत तरंगे यांना नियुक्तीचे पत्र दिलेले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लढवय्या व संघर्षयोद्ध्याला प्रदेश प्रवक्ते पदी योग्य संधी दिलेली आहे.

डॉ. शशिकांत तरंगे बळ आणि बुद्धीचातुर्याच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ठासून मांडतील. पक्षाचा विचार गावगाड्यातल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजितदादांचे विचार तळागाळात पोचवण्याचे काम करतील, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाड्यावस्त्या व गावागावातील कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.