वाढदिवसाचा आनंद समाजाच्या सेवेतून साजरा करूया!…

सोलापूर (बारामती झटका)
राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन ना. जयकुमार गोरे भाऊ यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले आहे.
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हे, तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी जपण्याची संधी!
दुष्काळामुळे आज अनेक शेतकरी, शेतमजूर आणि कुटुंबे कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा वेळी त्यांच्या दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदतीचा हात देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची जपणूक आहे.
जयकुमार गोरे भाऊ यांनी स्वतः कधीही वाढदिवस साजरा केलेला नाही. यंदाही वाढदिवसानिमित्त कोणत्याही अनावश्यक खर्चाऐवजी समाजाच्या हिताचे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.
फुलांचे हार, मोठे समारंभ आणि दिखाऊ उत्सव यांपेक्षा एखाद्या गरजू कुटुंबाला दिलेला मदतीचा हात, एखाद्या निराधाराच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आणि संकटात सापडलेल्या कुटुंबाला मिळालेला आधार अधिक मोलाचा ठरतो. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेली छोटीशी मदतही एखाद्याच्या आयुष्यात मोठा दिलासा देऊ शकते.

रक्तदान शिबिरे, गरजूंना अन्नधान्य वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रुग्णांना मदत, ज्येष्ठ नागरिकांची सेवा, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांतून हा दिवस साजरा करता येईल.
वाढदिवसाच्या शुभेच्छा कृतीतून व्यक्त करूया आणि समाजसेवेचा संकल्प करूया!
सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. आपल्या आनंदात समाजालाही सहभागी करून घेत, गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करावा, हीच अपेक्षा.
सोलापूर जिल्ह्याचे विकासप्रिय धडाकेबाज कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून अनेक विकासकामे होवोत, याच बारामती झटका परिवारातर्फे शुभेच्छा…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



