प्रा.सतीश कुलाळ पुणे पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात

पुणे (बारामती झटका)
पुरोगामी विचारांचं पोरगं, बहुजन चळवळीचा कार्यकर्ता, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्शाने कार्यरत असून या महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था सुरळीत करू पाहत आहे. गेली पंधरा वर्ष बहुजन ओबीसी धनगर, वंचित, उपेक्षित मेंढपाळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संपूर्ण महाराष्ट्राबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिकरित्या पूर्ण वेळ असणारे अभ्यासून नेतृत्व प्रा. सतीश कुलाळ हे पुणे पदवीधर मतदारसंघातून अनुक्रमांक 25 कुलाळ सतीश शहाजी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.
शिक्षक व पदवीधर या विधान परिषदेच्या जागा राजकीय पुनर्वसनाच्या नाही परंतु, राजकीय पक्ष लोकसभेची गणित जुळवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना या सिस्टीम मधून बाहेर गेले आहे. ज्यांनी या महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्थाच खाऊन टाकली खाजगीकरण केले ज्याचं कमर्शियल धंदा म्हणून बिजनेस करत आहेत, अशा संस्थाचालकांना किंवा त्यांच्या वारसांना राजकन्यांना पक्ष उमेदवारी देत आहे.

मी सर्व पश्चिम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील पदवीधर शिक्षक पत्रकार बांधव यांच्या वतीने शिक्षण व्यवस्थेवर चर्चा करायला या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून उभा असणाऱ्या उमेदवारांना जाहीर आव्हान करीत आहे, त्यांनी ते आव्हान स्वीकारून चर्चा करण्यासाठी कुठल्याही व्यासपीठावर माझ्यासोबत यावे ही अहंकाराची भाषा नसून ही व्यवस्थेमध्ये पडलेली दरी आहे. आज हे उमेदवार स्किल डेव्हलपमेंट रोजगार कौशल्यावरती बोलत आहेत परंतु, पदवीधर होण्यासाठी ओबीसी वजन असेल सर्वसामान्य ओपन मधला गरीब असेल मायनॉरिटी एससी एसटी या प्रवर्गातील विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक आणि हायर एज्युकेशन घेताना त्या हायर एज्युकेशनमध्ये ओबीसी, भटके मायनॉरिटी, एससी, सर्व सामान्य ओपन मधला गरीब समाजातील यांची मुलं व मुलींची सर्वात जास्त गळती प्रमाण होतं, यावरती या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था किंवा सरकारकडे कुठलीही व्यवस्था नाही. जेणेकरून मागासवर्गीय प्रवर्गातील मुली ज्यावेळेस पाचवीला शंभर असतात त्या दहावीला साठ उरतात. 11 व 12 वी ला 30 राहतात आणि हायर एज्युकेशन ला सात-आठ मुली राहतात. हे आताच महाराष्ट्र आहे आणि म्हणून पदवीधरची निवडणूक होत असताना पदवीधरांच्या प्रश्नांबरोबर आम्ही पदवीधरच होऊ शकत नाही, या वरतीसुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये 100% आवाज उठवणार आहे आणि कटिबद्ध आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



