रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाची सचिवांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन माळशिरस येथे कर्ज प्रकरणाची बैठक व्हावी….

पतसंस्थेच्या कर्ज वाटपाची व मर्यादेची माहिती मिळण्याकरता शासकीय ऑडिट केल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल…
अनंतलाल दोशी उर्फ दादासाहेब यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर मात्र वटवृक्षावर वटवाघुळांनी घाण केली..
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव राऊत यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी (PC) संपून मॅजेस्टिक कस्टडी (MC) मिळालेली आहे. रत्नत्रय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव पांडुरंग राऊत संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयाचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रीतम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे, सर्व रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांच्या विरुद्ध अवैध सावकारी करणे, ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशी दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 0493 गुन्हा नोंद झालेला आहे सदरच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465 ,468, 471, 506, 34, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमाअन्वये गुन्हा नोंद झालेला होता.
माळशिरस पोलीस स्टेशन येथील गुन्हा मधील मास्टर माईंड रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना माळशिरस पोलीसांनी अटक केलेली होती. माळशिरस येथील मेहरबान न्यायालयासमोर उभे केले असता गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्याकरता पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती. पाच दिवसाची पोलीस कस्टडी संपल्यानंतर मेहरबान न्यायालयासमोर हजर करून तपास अधिकारी यांनी वाढीव पोलीस कस्टडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने अजून दोन दिवस पोलीस कस्टडी वाढवून दिलेली होती. सात दिवसाची पोलिस कस्टडी संपून मॅजेस्टिक कस्टडी मिळालेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विशाल नवले पुढील तपास करीत आहेत.
रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व सर्व संचालकासह खाजगी सावकार व तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणारे या सर्वांना अटक करून माळशिरस पोलीस स्टेशन येथे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, सर्व संचालक मंडळ, सर्व खाजगी सावकार व खाजगी वसुली एजंट यांच्या समवेत कर्ज प्रकरणाची बैठक घ्यावी. पतसंस्थेच्या कर्ज वाटपाची व मर्यादेची माहिती मिळण्याकरता शासकीय ऑडिट केल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. त्यामुळे रत्नत्रय पतसंस्थेच्या ठेवीदार, कर्जदार, सभासद, हितचिंतक यांच्या मनातील शंकाकुशंका दूर होतील..

रत्नत्रय पतसंस्थेचे संस्थापक अनंतलाल दोशी उर्फ दादासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थेची सुरुवात करून कर्जदार यांचा विश्वास संपादन करून छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर केलेले आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार उभा राहिलेले आहेत. तर अनेक लोकांचे संसार उध्वस्त का झाले, हेही पाहणे गरजेचे आहे. दादांकडे पतसंस्थेचा व्यवहार होता तोपर्यंत सुरळीत होता. दादांनी चेअरमन, सचिव, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्यावर विश्वास ठेवलेला होता. विश्वासाला पात्र पदाधिकारी राहिलेत का नाही, हे तपासणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय ऑडिट केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. बनावट खोट्या सह्या करून नकली कागदपत्रे तयार करून बनावट कर्ज उचलून रकमेचा गैरवापर केल्याची तक्रार दिपक गोरे यांनी केलेली आहे. ऑडिट केल्यानंतर यामधील सत्य बाहेर येईल. त्यामुळे तक्रारदार दिपक गोरे यांनी केलेल्या तक्रारी मध्ये तथ्य आहे का नाही, हे वास्तव बाहेर येईल. जर खरंच चेअरमन, सचिव, संचालक मंडळ, दोषी असतील तर अनंतलाल दोशी उर्फ दादा यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले मात्र वटवृक्षावर वटवाघूळांनी घाण केली आहे का, याची सर्व माहिती समोर येईल. यासाठी चेअरमन व सर्व संचालक, खाजगी सावकार, वसुलरदार, एजंट यांची पोलीस स्टेशन येथे बैठक घेऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी सदाशिवनगर पंचक्रोशी व सहकार क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे. यासाठी तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल नवले यांनी अशा पद्धतीने तपासाची दिशा अवलंबावी अशी चर्चा सुरू आहे.
रत्नत्रय पतसंस्थेचा विषय सुरू असतानाच रत्नत्रय विद्यालय व महाविद्यालय यामध्ये विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते. देणगी वर्गणी मधून शाळा बांधली गेलेली आहे, याचीही चर्चा सुरू आहे. याविषयी माहिती घेऊन सविस्तर बातमी दिली जाणार आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



