माळशिरस तालुक्यातून पदवीधर डॉ. स्मिता पाटील व शिक्षक कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी माजी आमदार राम सातपुते यांची जमिनीवर बसून कार्यकर्त्यासारखी जय्यत तयारी..

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ संवाद बैठकीचे श्रीराम बंगल्यावर आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते पदवीधर डॉ. स्मिता पाटील व शिक्षक कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील मतदार यादी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून माळशिरस तालुक्यातून जास्तीत जास्त मतदार देऊन विजयासाठी जायत तयारीला लागलेले आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ संवाद बैठकीचे श्रीराम बंगल्यावर शुक्रवार दि. 16/10/2026 रोजी सकाळी नऊ वाजता आयोजन केलेले आहे..
भारतीय जनता पार्टीचा विजयाचा अश्वरथ सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना समवेत घेऊन सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर महानगरपालिका व ग्रामीण जिल्ह्यातील पंचायत समिती यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दैदीप्यमान यश संपादन केलेले आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघात माळशिरस तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार यांना देण्यासाठी राम सातपुते यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून मतदारांची यादीचे अवलोकन केलेले आहे.

माळशिरस तालुक्यात पदवीधर मतदार 6517 आहेत तर शिक्षक 1269 आहेत. भाजपा का जिंकते याचं कारण म्हणजे इथे नेते सुद्धा जमिनीवर बसून जीव ओतून काम करत असतात, विरोधी केवळ टीका करतात पण असे बूथ स्तरावर काम करून निवडणुका लढताना कधी दिसले आहेत का ! असाही सवाल उपस्थित होत आहे. भाजपा नेते रामभाऊ सातपुते जमिनीवर बसून कार्यकर्त्यांसोबत बूथच्या याद्या हाताळत होते, प्रत्येक गावातील मतदारांची नावे वाचून पडताळणी केली जात होती. नेते स्वतः जेव्हा जमिनीवर येतात, तेव्हा कोणतीही मोठी निवडणूक विजयात रूपांतरित होते. हेच भाजपच्या विराट विजयाचे वैशिष्ट्य राहिले आहे. पदवीधरसाठी माळशिरस येथे तीन बूथ, अकलूज येथे चार, दहिगाव एक, नातेपुते दोन, वेळापूर दोन, पिलीव एक अशी बूथ रचना आहे. तर शिक्षक साठी माळशिरस एक, अकलूज एक, दहिगाव एक, नातेपुते एक, वेळापूर एक अशी बुथ रचना राहणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



