मांडकीचे माजी सरपंच बापूराव नामदेव धाईंजे यांचे दुःखद निधन…

मांडकी (बारामती झटका)
मांडकी गावचे माजी सरपंच बापूराव नामदेव धाईजे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गुरुवार दि. १५/१०/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा अभिमान बापू धाईंजे, मुलगी उज्वला विजय ओवाळ, सून स्वाती अभिमान धाईंजे, भाऊ, मारुती, सुखदेव, हरी, नातू मृणाल, श्रुती, निखिल, भक्ती असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर गुरुवारी रात्री ८ वाजता राहत्या निवासस्थानाशेजारी शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. १७/१०२०२६ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
कालकथीत बापूराव नामदेव धाईंजे यांनी सन २००५ ते १० या कालावधीत सरपंच पदाची धुरा सांभाळलेली आहे. अतिशय सौजन्यशील स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून वागत असत. आपल्या मिळालेल्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलेले होते. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे आधारवड होते. सर्व जातीधर्मात त्यांना मानाचे स्थान होते.
त्यांच्या जाण्याने धाईंजे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. धाईंजे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व कालकथीत सरपंच बापूराव धाईंजे यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



