मोहिते-पाटील, मा. आ. राम सातपुते, आ. उत्तमराव जानकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली…

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढतीत कोण अग्रेसर ठरणार, यावर भविष्यातील राजकारणाचं गणित ठरणार..
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सोसायटी मतदार संघात शहाजीराव देशमुख, ज्ञानराज पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यात जरी लढत झाली असली, तरी विधान परिषदेचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस विधानसभेचे मा. आमदार राम सातपुते, माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सोलापूर जिल्हा बँकेच्या तिरंगी लढतीत कोण अग्रेसर ठरणार, यावर भविष्यातील राजकारणाचं गणित ठरणार आहे.
100% मतदान!
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष सहकार विकास पॅनलच्या दहा जागा बिनविरोध झालेल्या आहेत. नऊ जागांची निवडणूक पार पडलेली आहे. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातून सोसायटी मतदार संघाच्या निवडणुकीकडे सोलापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. 141 मतदार होते, 100% मतदानाचा मतदारांनी हक्क बजावलेला आहे.
शिवरत्न बंगल्याचं वर्चस्व की नवा अध्याय?
सोलापूर जिल्हा बँक स्थापनेपासून शिवरत्न बंगला मोहिते-पाटील यांचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. यावर्षीच्या निवडणुकीतील चित्र वेगळे आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समितीचे सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना निवडणुकीत उतरवलेले होते.
मोहिते-पाटील गटाचे सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रभारी चेअरमन पदावर काम केलेले शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवलेली आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी निवडणुकीची राजकीय रणनीती आखलेली होती.
माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांना निवडणुकीत उतरवलेले आहे.
उद्या चित्र स्पष्ट होणार!
खरी लढाई मोहिते-पाटील, सातपुते, जानकर यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. मतदारांनी मतदान करताना कशा पद्धतीने केलेले आहे, याचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झालेले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. सोसायटीचा मतदार सुज्ञ असतो, त्यामुळे मोहिते-पाटील यांना माळशिरस तालुक्यात खरा विरोधक कोण, याचीही गिनती होणार आहे. तिरंगी लढत झालेली आहे. मतदारांनी जर लढत धरली तर तिसऱ्या उमेदवाराला दोन अंकी मतदान सुद्धा पडेल का नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उद्या मतमोजणी झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



