जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर डिक्लेअर केला नाही, तर पुणे एक्सप्रेस हायवे वर मोठे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल…

१ डिसेंबर रोजी साखर कारखानदारांची मिटींग लावण्यात येणार – स्वाभिमानीचे पक्ष प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर
पुणे (बारामती झटका)
आज पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन साखर कारखानदारांच्या बरोबर मिटींग लावण्याचे निवेदन दिले आहे. यापूर्वीही स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, प्रकाश बालवडकर यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने दोन वेळा भेटी घेऊन, त्यांच्यावर मिटींग लावण्याचे निवेदन दिलेले असतानाही, केवळ साखर कारखानदारांच्या दबावाखाली येऊन टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज पुणे जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर व शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिले. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी यामध्ये स्पष्ट केलेले आहे की, दि. 1/12/26 रोजी सकाळी अकरा वाजता साखर उत्पादक कारखानदार यांच्याबरोबर ऊस दराच्या बाबतीत मिटींग लावण्यात येईल. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनाही मीटिंगचे आमंत्रण देण्यात येईल.
जर ऊस दर हा राज्यामध्ये मा. खासदार राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने कोल्हापूर व सांगली प्रमाणे दर प्रश्न मार्गी लावला त्याच पद्धतीने पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी डिक्लेअर केला नाही, तर पुणे एक्सप्रेस हायवे वर रावेत, पुनावळे या ठिकाणी मोठे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व ती सर्व जबाबदारीही पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची व पोलीस प्रशासनाची राहणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला दोन्हीही विभाग जबाबदार राहतील, असे स्पष्टपणे या ठिकाणी जिल्हा अधिकारी यांच्या बरोबर स्पष्ट करण्यात आलेले आहे.
अनेक कारखानदारांनीही 3200 ते 3500 दर डिक्लेअर केलेले आहेत.. परंतु हे दर साखरेची किंमत पाहता इतर उपपदार्थांचे किमती पाहता अत्यंत नगण्य आहे. शिवाय यावर्षीची एफआरपी ही 3650 असताना स्वतःच्या स्वार्थापोटी सदर साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून कोणत्याही प्रकारचा चांगल्या पद्धतीचा दर देण्याची टाळाटाळ करीत आहेत. याचा आम्ही गांभीर्याने विचार करून सदरील रस्ता रोको करणार असून वेळप्रसंगी आम्ही रेल्वे रोको हे आंदोलन ही करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाचे प्रकाश तात्या बालवडकर यांनी स्पष्ट केलेले आहे.

कृपया या मागणीचा विचार करावा असे स्वतः नमूद करून जिल्हाधिकारी साहेब यांच्या समवेत प्रकाश बालवडकर यांचा संवाद झाल्याचे सांगितले. साखर कारखानदारांची एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मिटींग लावण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे पक्ष प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.


