घार फिरते आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी, तसंच मतदार फिरतात कोठेही मात्र लक्ष आहे बाबाराजेंच्या कपबशीपशी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शहाजीराव देशमुख यांची कपबशी तालुक्यात नवा अध्याय करणार..
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 19 जागांपैकी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष पुरस्कृत सहकार विकास पॅनलच्या दहा जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित नऊ जागांसाठी गुरुवार दि.26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 08 ते दुपारी 04 या वेळेमध्ये मतदान होणार आहे.
माळशिरस तालुक्याच्या सोसायटी मतदार संघातून शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख – कपबशी, ज्ञानराज पाटील – ट्रॅक्टर, अर्जुनसिंह मोहिते-पाटील – शिट्टी अशी चिन्हे मिळालेली आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक अटीतटीची व चुरशीची सुरू आहे.
घार फिरते आकाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी, तसंच जिल्हा बँकेचे मतदार फिरतात कोठेही मात्र लक्ष आहे बाबाराजेंच्या कपबशीपशी, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांची कपबशी माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय करणार, अशी राजकीय विश्लेषकांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



